पाटील इस्टेटमध्ये मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर

You are currently viewing पाटील इस्टेटमध्ये मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर

पुणे, 4 जून 2023

“जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त” (31 मे) पुण्यातील शिवाजीनगर पाटील इस्टेटमध्ये मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने १६२ लोकांचे “मोफत मौखिक व दंत तपासणी शिबिर” आयोजित करण्यात आले होते.


या कार्यक्रमात वस्तीमध्ये जनजागृती फेरी काढण्यात त्यात मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड येथील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या शिबिरात तोंडाचा कर्करोग, लहान मुले व प्रौढांच्या दातांची तपासणी, वाकडे व पुढे आलेल्या दातांची तपासणी, दात काढणे इ बाबत सल्ला मार्गदर्शन करण्यात आले.


प्रमुख पाहुणे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की,मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचा मुलांनी फायदा करून घ्यावा. कला, खेळ, कौशल्य विकसित करून त्या प्रकारचा चांगला व्यसन जोपासा ज्यामुळे भविष्य उज्ज्वल होईल.


डॉ भूषण फलक, डॉ अनुजा महाजन म्हणाले की “तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मौखिक तसेच दातांचे आरोग्य बिघडत असून दात आणि तोंड हा आपला एक महत्त्वाचा भाग असून त्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे आणि व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे गरज आहे. संस्थेचे संचालक डॉ विष्णू श्रीमंगले यांनी संस्थेची भूमिका मांडली. यावेळी मैत्रेयी पाध्ये, अपूर्वा कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply