साधनाच्या तांबे-रायमाने शिष्यवृत्तीसाठी चौघा अभ्यासकांची निवड

You are currently viewing साधनाच्या तांबे-रायमाने शिष्यवृत्तीसाठी चौघा अभ्यासकांची निवड

पुणे, दि. 16 एप्रिल 2022

साधना साप्ताहिकाच्यावतीने तांबे-रायमाने शिष्यवृत्ती चौघांना जाहीर करण्यात आली आहे. जागल्या वेब पोर्टलचे प्रतिनिधी सतीश पवार यांना ‘पुणे महापालिकेची रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था’ या विषयाच्या अभ्यासाठी ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. त्याचबरोबर अनुराधा नारकर मिनाज लाटकर व सुनीता सावरकर यांना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीधारक व त्यांचे अभ्यासाचे विषय

अनुराधा शोभा भगवान नारकर, मुंबई विषय : स्त्री – पुरुष व पारलिंगींना घरात , समाजात दर्जाची व संधीची समानता मिळते आहे का हे समजून घेणे

सतीश दत्ताहरी पवार, पुणे
विषय : पुणे महानगरपालिकेतील सरकारी रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास

मिनाज लाटकर, कोल्हापूर
विषय : मुस्लिम महिलांची राजकीय समज विकसन आणि : निर्णयप्रक्रियेचा अभ्यास

सुनिता सावरकर, औरंगाबाद
विषय : मिलिंद भित्तीपत्रकातील दलित चळवळीच्या साहित्यिक सृजनाचे ऐतिहासिक संदर्भ

श्रीकांत तांबे व ल.बा. रायमाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ

तांबे – रायमाने पाठ्यवृत्तीसाठी १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ या काळात ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुणांकडून अर्ज मागवले होते . एकूण ६३ अर्ज आले . त्यातून पुढील चार तरुणांची निवड या पाठ्यवृत्तीसाठी केली आहे.

या चौघांना प्रत्येकी ५०,००० ( पन्नास हजार ) रुपये पाठ्यवृत्ती रक्कम दिली जाणार आहे मात्र उर्वरित ५ ९ पैकी आठ – दहा अर्जदारांचे प्रस्तावही उत्तम आहेत . त्या सर्वांना अन्य कोणाच्या नावे पाठ्यवृत्ती देऊन किंवा अन्य प्रकारे सामावून घेण्याचा विचार करीत साधना साप्ताहिक करत आहे . त्यासंदर्भातील निवेदन २५ एप्रिल २०२२ दरम्यान प्रसिद्ध केले जाणार आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply