थांबलेले शिक्षण 17 नंबर फॉर्म भरून पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक
यानुसार फॉर्म भरून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संपर्क शाळा व राज्य शिक्षण मंडळ आदींकडून अडवणूक होऊ लागली आहे. ही 17 नंबर फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व अतिरिक्त शुल्क भरावे न लागता व्हावी यासाठी राज्य मंडळाने योग्य ते बदल करण्याची मागणी बाल हक्क कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
आरोग्य, शिक्षण, रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला आताशेवटची मुदत : डॉ. बाबा आढाव
राष्ट्रीय एकात्मता समितीच्यावतीने क्रांती सप्ताह जन की बात : 'हर घर तिरंगा, हर घर संविधान' अभियान राबवला जात आहे. याअंतर्गत आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर सेंट्रल बिल्डिंग येथे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
राज्य सेवा परीक्षेमध्ये उर्दू साहित्य हा वैकल्पिक विषय एमपीएससीने उपलब्ध करावा
उर्दू भाषेचे महाराष्ट्राशी खूप गहिरे नाते आहे हे आपण विसरता कामा नाही. या भाषेच्या निर्मितीमध्ये दख्खनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शुल्कातून जमा होणारा 600 कोटींचा विद्यापीठ फंड म्हणजे आपल्याला मिळालेली जहागिरी आहे, असा समज काही अधिकाऱ्यांचा झाला आहे. जर हे थांबले नाही तर श्रीलंकेत घडले अगदी तसेच विद्यापीठ सोडून पळ काढण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी आंदोलनातील एक दिवस
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनावर पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेतील एक तरुणी सध्या पुण्यात आली आहे. ती काल विद्यापीठात भेटली. मी तिला विचारले, इतकं न्यूयॉर्कवरून पुण्यात येऊन इथल्या विद्यार्थी आंदोलनांचा अभ्यास करावा असे तुला का वाटले.
अमरावतीच्या लाचखोरीच्या घटनेनंतर उच्च शिक्षण विभागाचा तुघलकी निर्णय : राज्यातील सर्वच सहसंचालक कार्यालयात प्राध्यापकांनी जाण्यावर निर्बंध
त्यानंतर हादरलेल्या उच्च शिक्षण विभागाने एक तुघलकी निर्णयाचे परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांच्या सहसंचालक कार्यालयात जाण्यावर निर्बंध टाकण्यात आले आहेत.
पडसाद उमटतायत आणि धीम्या गतीने का होईना मात्र बदल घडतायत, त्यामुळेच हे करायला बळ मिळतेय
विशेषतः आता विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी हे विद्यापीठाचे खरे स्टेक होल्डर जागृत होऊन पुढे येत आहेत. या गोष्टी हे मांडायला आणखी बळ देत आहेत. त्यामुळे याविरोधात आपल्याला शक्य आहे तितके सगळे मिळून झटत राहुयात.
कुलगुरू सर व प्र-कुलगुरू सर, ही माझी भाबडी मागणी पूर्ण करता आली तर पहा
फोन वगैरे तर काय सर तुम्हांला इतका भरभक्कम पगार मिळतो, त्यातून तुम्ही हवा तो मोबाईल घेऊ शकाल. पण फी अभावी माझे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडतायत, ते आपण थांबवू शकू.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि विद्यापीठ निधीचा अपहार करणाऱ्या भ्रष्ट कुलसचिवांवर कारवाई होणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत बंदिस्त करण्याचे काम तातडीने थांबवावे व भ्रष्ट कुलसचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, विद्यापीठ अपहार निधीची वसुली करावी या मागण्यांसाठी काल विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
एका तरुण डॉक्टरने गावाकडच्या मुला-मुलींना आयएएस, आयपीएस करण्याचे बघितलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले
यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण बारा (१२) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व आठ (८) विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन अशा एकूण 20 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उपक्रम राबविला. त्यातील दोन विद्यार्थ्यांनी आज लागलेल्या निकालामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.