पत्रकारितेची चौकट ओलांडून वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न
केवळ वेब पोर्टलवर याबाबतच्या बातम्या, लेख लिहून हे साध्य होणे अवघड व अपुरे वाटते. त्यामुळे पत्रकारितेची चौकट ओलांडून बातम्या लिहण्याबरोबरच प्रत्यक्ष कृती करण्यास सुरुवात केली आहे.
तुम्ही शेकडो न्यूज चॅनल, पेपर विकत घ्या पण टोकदार प्रश्न विचारणारी पत्रकारिता कधीच संपवू शकणार नाही
रवीशचे हे शब्द खूप उमेद वाढवणारे आहेत. तो कुठेही खचलेला नाही किंवा निराश ही झालेला नाही. तो म्हणतोय, "माझे घरटे जरूर ताब्यात घेतले आहे, मात्र मला त्याबाहेर खूप मोठे आकाश दिसते आहे."
राहुल गांधींनी जाणून घेतले सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न
कन्याकुमारीपासून निघालेली भारत जोडो यात्रा जशी पुढे सरकत आहे तशी ती अधिकाधिक प्रभावी होत चालली आहे. केवळ या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून नाही तर यात्रेत घडत असलेल्या संवाद प्रक्रिया आणि विचारमंथनामुळे ती महत्त्वाची बनत आहे.
‘भारत जोडो’च्या वादळाचे महाराष्ट्रात मनःपूर्वक स्वागत
'सामाजिक चळवळीतील लोकांनी आपल्या सामाजिक कामांवरच लक्ष द्यायचे, जाहीर राजकीय भूमिका घेणे शक्यतो टाळायचे' असा एक मतप्रवाह आहे. मला वाटते सद्य परिस्थितीमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी तो विचार बाजूला ठेऊन ठाम राजकीय भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.
नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळांवरील आरोपांचा खोटेपणा उघड करणारा वस्तुस्थिती अहवाल प्रकाशित
नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित जीवनशाळांवर काही आरोप करण्यात आले. त्याबाबतची पडताळणी करण्यासाठी समाजवादी शिक्षण हक्क सभेच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांची एक टीम प्रत्यक्ष नर्मदा खोऱ्यात पाठवण्यात आली. त्यांनी या जीवनशाळांना भेटी देऊन वस्तुस्थिती अहवाल तयार केला आहे.
नर्मदेच्या खोऱ्यात तरुणपणीच आलो हे मात्र खूप बरे झाले, कारण इथून मिळालेली प्रचंड ऊर्जा आता यापुढे वापरता येईल
नर्मदेच्या खोऱ्यात संवाद यात्रेसाठी जात असल्याने काही दिवस मी पुण्यात नसेन परत आल्यावर आपण मीटिंग घेऊयात असं एका मित्राला सांगत होतो. त्यावेळी तो बोलून गेला. "अरे, ते आंदोलन तर आता संपले ना, मग आता कशासाठी तिकडे चालला आहे." त्यावर काही न बोलता स्मितहास्य करून मी तिथून निघालो. मात्र आता त्याला मी तिथे का गेलो होतो, हे नक्की सांगावसे वाटतेय.
पुण्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या संघटित प्रयत्नांना सुरुवात
जन आरोग्य अभियानच्यावतीने शनिवार, 10 सप्टेंबर रोजी शहरी आरोग्य या विषयावर पुणे व पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला 20 संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहिले.
गणेशोत्सवात महागाईच्या प्रश्नाला लोकायतने पथनाट्याद्वारे फोडली वाचा
दरवर्षी लोकायत नागरी समितीतर्फे गणेशोत्सवात विविध सामाजिक प्रश्नांवर कार्यक्रम सादर केले जातात. या वर्षी खडकीतील संविधान प्रबोधन मंच, गोखलेनगर मधील लाल बहादुर शास्त्री तरुण मित्र मंडळ व आराधना स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळ, बोपोडीतील फ्रेंड्स युथ क्लब अशा अनेक मंडळांमध्ये सलग 4 दिवस नाटक सादर केले गेले.
जुन्नरच्या उसरानमध्ये साजरा झाला आगळा वेगळा रानभाज्या उत्सव
विविध पोषण पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिके करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील महिलांनी स्थानिक रानभाज्यांचे संकलन केले होते. तसेच रानभाज्यांचा समावेश असलेले विविध पदार्थ तयार करून आणले होते.
व्हॅटिकनचे पोप आणि पोर्तुगालच्या मंत्री मार्था तर्मिडो यांचा वैश्विक आदर्श मानवतेला अनुकरणीय
संपूर्ण जगभरात त्या मानवी स्वारस्याच्या दृष्टीने शुभ वार्ता (good news) ठरल्यात. त्या दोन्ही वार्ता ख्रिस्ती जगतात मोठा प्राचीन इतिहास असलेल्या इटलीतील रोम आणि पोर्तुगाल देशातून आल्या. जणू मानवतेचा संदेश देणाऱ्या.