इंदिरा वसाहतीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

You are currently viewing इंदिरा वसाहतीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुणे, 15 ऑगस्ट 2023

संविधान अभ्यास गटाच्यावतीने इंदिरा वसाहत येथे आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सफाई कामगार भगिनी संगीत वर्स, रेखा भोसले, रेखा नागटिळक, रंजना भडकवाड यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. झेंडा फडकविण्याचा मान मिळाल्याने त्यांनी खूप आनंद व समाधानाची भावना व्यक्त केली.


यावेळी पत्रकार दीपक जाधव यांनी विचार व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ रणदिवे यांनी सर्वांचे आभार मानले.
लहान मुले व उपस्थित सर्वांना खाऊचे वाटप करण्यक्त आले. यावेळी बाळासाहेब गायकवाड, अक्षय खवळे, मीरा सोनवणे, रामधन गायकवाड, संजय वाघमारे, विशाल जोगदंड व वस्तीमधील नागरिक उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply