डॉक्टर, चळवळ पुढे पुढेच नेत राहू

You are currently viewing डॉक्टर, चळवळ पुढे पुढेच नेत राहू

प्रिय डॉक्टर, (डॉ. नरेंद्र दाभोलकर)


गेल्या 9 वर्षात असंख्य प्रसंगात तुमची आठवण आली. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तुमचा सर्वाधिक प्रभाव पडलेला आहे. ज्यावेळी सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर जागल्या वेब पोर्टलच्या माध्यमातून पूर्णवेळ काम करण्याचा मी निर्णय घेतला, त्यावेळी तर तुमची अधिक तीव्रतेने आठवण आली. हा निर्णय मी तुम्हांला जेव्हा सांगितला असता तेव्हा तुम्ही पाठीवर हात ठेवून पुढे काय-काय करता येऊ शकेल हे छान समजावून सांगितले असते. अनेकदा माझ्या सोबत यासाठी फिरला असता, कायम भक्कमपणे सोबत उभे राहिला असता. त्यामुळे तुमची उणीव कायम नक्कीच जाणवत राहते.

मात्र तुम्ही तुमच्या आचार, विचार, लेखन आणि कृतीतून खूप मोठे विचारधन आमच्यासाठी सोडून गेला आहात. तुमच्या सोबत घालवलेल्या क्षणांमधून मिळालेली प्रेरणा, तुमची भाषणे, मुलाखती, लिहलेली पुस्तके, लेख अशी मोठी शिदोरी आमच्यासोबत आहे. त्याआधारे विवेकाच्या वाटेवरुन चालत राहू, आपली चळवळ पुढे पुढेच नेत राहू.
विनम्र अभिवादन।

तुमचाच,
दीपक जाधव

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply