भ्रष्टाचाराचे आरोप व ईडीचा ससेमिरा लावलेल्यांकडून मोदीजी स्वत:चे गोडवे कसे काय गाऊन घेतात? : गोपाळदादा तिवारी

You are currently viewing भ्रष्टाचाराचे आरोप व ईडीचा ससेमिरा लावलेल्यांकडून मोदीजी स्वत:चे गोडवे कसे काय गाऊन घेतात? : गोपाळदादा तिवारी

पुणे, दि. 30 ऑगस्ट 2023


मध्यरात्री वेषांतरे करून, राजकीय घरफोड्या करून, केंद्राच्या आशिर्वादाने संख्याबळ हस्तगत करून, अडनीट वेळी सत्तेवर आलेल्या ‘भाजप प्रणीत सरकारला’ प्रशासन ही चालवता येऊ नये ही भाजप’ची नामुष्की असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे. ‘ना खाऊंगा ना खानेदुंगा’ म्हणणाऱ्या ढोंगी नेतृत्वाने, ‘भ्रष्टाचाराचे आरोप व ईडी’चा ससेमिरा लावलेल्यांकडुनच ‘सत्तेत बसवल्यावर’…’मोदी जी स्वत:चे गोडवे गाऊन घेतात काय(?) असा उपरोधीक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

राज्यातील जनतेने, २०१९ च्या निवडणुकीत… मोदी-शहांच्या भाजप विरोधात “काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीस” मतदान केले, ही वास्तवता नाकारता येत नाही. मात्र, सेना-भाजप युती २०१९ मध्ये राज्यास सरकार देश शकले नाही, तेंव्हाच ‘प्राप्त परिस्थितित’ (किमान समान कार्यक्रमावर) मविआ स्थापित झाली. मात्र अडीच वर्षात मविआ सरकार पाडुन भाजपने शिवसेनेतील फुटीर गटा सोबत संख्या बळाचे आधारे सरकार स्थापित केले, मात्र सरकार चालवु न शकल्याने, अपयशी भाजपने, भ्रष्टाचारी विरोधकांनाच सत्तेच्या पायघड्या घातल्या.

सत्ताधाऱी ईडी सरकार’ विरोधात उर्वरीत मविआ तर्फे ‘विरोधीपक्षाची जनतेने दिलेली जबाबदारी’ पार पाडण्या ऐवजी, आपल्या भुमिकेशी प्रतारणा करीत, मा अजितदादा पवारांसह राष्ट्रवादीचे ९ नेते देखील मंत्री- मंडळात लगोलग सामिल झाले.
वास्तविक सत्ताधीशांच्या विरोधात ‘चौकीदाराच्या भुमिकेतुन’ भुमिका पार पाडणे विधान सभेतील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचे संविधानिक कर्तव्य होते.

केंद्रातील भाजप सरकार हे “शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे, बेरोजगारी व महागाई वाढवणारे, राष्टीय संपत्ती व सार्व बँकांना चुना लाऊन पसार झालेल्यांना पाठीशी घालणारे” असल्याची टीका करीत “काँग्रेस-राष्ट्रवादी सह इंडीया आघाडी” एकत्र येत आहे अशा परिस्थितीत, राष्ट्रवादीचे नेते म्हणवणाऱ्यांना “मोदी – शहांचा साक्षात्कार होऊन भाजप तारणहार(?) वाटणे ही जनतेशी, स्व-पक्षाच्या राजकीय भुमिकेशी व विश्वासार्हतेशी प्रतारणा आहे, असे खडे बोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सुनावले.

महाराष्ट्रास, ‘तत्वे व विचारांवर, राजकीय व सामाजिक उंची गाठलेल्या ‘क्रांतीकारक नेत्यांचा’ वारसा आहे, म्हणुन महाराष्ट्राचे महत्व देशांत अनन्य साधारण आहे. मात्र संस्कार, नैतिकता व सभ्यतेचा वारसा जपत आलेल्या महाराष्ट्रात सत्तेच्या हव्यासापोटी राजकीय नेत्यांचे असे बेजबाबदार वर्तन अपेक्षीत नव्हते व नाही.

९ मंत्री सोडुन उर्वरीत आमदारांनी, जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप विरोधात दिलेला कौल लक्षांत घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वा सोबतच असल्याचे ‘स्वाक्षरी निवेदनाद्वारे’ ज़ाहीर करणे व इंडीया आघाडीस बळकटी देत स्वतःची विश्वासार्हता स्पष्ट करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

अन्यथा, जनतेने काँग्रेस_राष्ट्रवादी आघाडीस दिलेल्या पसंतीशी प्रतारणा ठरेल व ९ नेत्यांच्या ‘मोदी व भाजप धार्जिण नव्या भूमिकेशी’ समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत असल्याचा चुकीचा संदेश जाईल अशी पुस्ती ही काँग्रेस प्रवक्ते यांनी जोडली.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply