राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त पुणे जिल्हा हिवताप कार्यालयामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम व रॅली

You are currently viewing राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त पुणे जिल्हा हिवताप कार्यालयामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम व रॅली

पुणे, दि. 16 मे 2023

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय पुणे या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व त्यानंतर रॅली काढण्यात आली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक संचालक डॉ सारणीकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. ढेकळे उपस्थित होते.

सहाय्यक संचालक डॉ. सारणीकर यांनी डेंग्यू उपाययोजना व प्रतिबंध या विषयी मार्गदर्शन केले व त्याबाबत करावयाच्या उपायोजना बाबत माहिती दिली.

राष्ट्रीय डेंग्यू दिवसाचा इतिहास
दरवर्षी 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना या आजाराबद्दल जागरुक करणे आणि त्याची लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल माहिती देणे. हा दिवस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागरुकता असली तरी तरीही ते या आजाराला बळी पडतात. डेंग्यू या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि त्याबाबत अचूक माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

डेंग्यू आजाराची कारणे
डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात.

डेंग्यू रोगाची लक्षणे
ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, सांधे आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवणे, थकवा,उलट्या होणे, मळमळ, त्वचेवर पुरळ उठणे, नाक, हिरड्यांमधून रक्तस्त्राव

डेंग्यू टाळण्यासाठी उपाय
-तुमच्या घराच्या आत किंवा बाहेर डासांची पैदास होऊ देऊ नका.
-घरामध्ये घाण पाणी साचू देऊ नका.
-भांड्यात पाणी किंवा छतावर इतर कोणतीही वस्तू असल्यास लगेच फेकून द्या.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply