लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यजागर

You are currently viewing लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यजागर


पुणे, दि. 1 ऑगस्ट 2023

कस्तुरबा व इंदिरा वसाहत येथे ज्ञानतपस्वी वाचनालय व संविधान अभ्यास गटाच्यावतीने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 वी जयंती साजरी करण्यात आली. कस्तुरबा वसाहत येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ कांबळे, दत्ता भाऊ रणदिवे, लताताई गडसिंग, शारदाताई पुळवले, शंकर भोसले, संजय वाघमारे, अनिल पळवले, संतोष जाधव, अक्षय खवळे, संतोष मोरे, अमिना शेख, अलका घडसिंग, सिंधुताई शिंदे, गंगुबाई वाघमारे, छबूताई क्षीरसागर, आशा ताई स्वामी, मनीषाताई पाटोळे, जयश्रीताई क्षीरसागर, मालन काकडे, छबुबाई घडसिंग , इंदूबाई शिंदे, महापुरे ताई, कांबळे मामा, प्रतिश जाधव, संतोष जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदिरा वसाहत येथील ज्ञानतपस्वी वाचनालय पावसामुळे बंद ठेवावे लागले आहे. या वाचनालयासाठी पत्र्याचे शेड उभारण्याचा निर्धार यावेळी सगळ्यांनी व्यक्त केला. या वाचनालयासाठी पुस्तके देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. वस्त्यांमध्ये वाचनाची चळवळ वाढावी, अण्णाभाऊंसारखे साहित्यिक तयार व्हावेत, त्यांनी लेखणीद्वारे समाजाचे प्रश्न मांडावेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महामानवांच्या जयंत्या डीजे न लावता वैचारिक पद्धतीने साजऱ्या व्हाव्यात अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply