कॉम्रेड शहीद भगतसिंग स्मृतिदिन आणि नास्तिक मेळावा

You are currently viewing कॉम्रेड शहीद भगतसिंग स्मृतिदिन आणि नास्तिक मेळावा

 पुणे, दि. 26 मार्च 2022

कॉम्रेड शहीद भगतसिंग यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने नास्तिक मेळाव्याचे आयोजन येत्या १० एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले आहे. सकाळी १०.००  ते १.०० या वेळेत एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पत्रकार भवनच्या मागे, पुणे येथे हा मेळावा होईल.

कार्यक्रम पत्रिका

सकाळी १० ते १०.१५ – नाव नोंदणी. 
१०.३० ते ११.४५ – य.ना.वालावलकर लिखित “विवेक विचार” पुस्तकाचे प्रकाशन

आणि मान्यवर वक्त्यांची भाषणे 

●प्रमुख व्याख्याते
●कार्यक्रमाचे अध्यक्षा – मुग्धा कर्णिक ( विचारवंत लेखिका )

● प्रा डॉ शरद बाविस्कर ( विचारवंत लेखक)

● तुकाराम सोनवणे (विचारवंत लेखक)

कार्यक्रम निमंत्रित लोकांसाठीच आहे कार्यक्रमला येण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. 

मी नास्तिक का आहे

२३ मार्च हा शहीद दिन म्हणून मानला जातो. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना या दिवशी फाशी देण्यात आली. क्रांतीकारी म्हणून भगतसिंग यांचा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. मात्र भगतसिंग यांच्या वैचारिकतेबाबत सोयीने मौन पाळलं जातं. भगतसिंग हे केवळ उत्स्फुर्तपणे क्रांतीकारक झाले नव्हते, तर त्यामागे त्यांचा भक्कम वैचारिक पाया होता. अभ्यास, मनन करून ते वैचारिकदृष्ट्या विवेकवादी होते, नास्तिक होते. ‘मी नास्तिक का आहे’ हे सांगताना ते लिहितात.

“मी क्रांतीकारी होतो. मात्र क्रांतीच्या रोमॅन्टीक आदर्श कल्पना आधी माझ्या डोक्यात होत्या. आमच्या सोबतचे अनेक क्रांतीकारक देव, या संकल्पनेबाबत स्पष्ट नव्हते. हे माझ्या लक्षात आलं. आम्ही केवळ दुसऱ्याचं अनुकरण करत होतो. पण आपल्या खांद्यावर जबाबदारी घेण्याची वेळ आली होती, अशावेळी काही गोष्टींबाबत आपली भूमिका स्पष्ट व्हायला हवी होती. माझ्या क्रांतीकारी जीवनातील तो अत्यंत निर्णायक असा क्षण होता. मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अभ्यास आणि मनन करण्याची उत्कटता मनातून होत होती. परंपरागत तर्कांचा प्रतिवाद करायचा असेल, तर अध्ययनाला पर्याय नव्हता. मी कामाला लागलो. या अध्ययनाच्या प्रक्रियेत माझे जुने विचार, विश्वास मागे पडत गेले. डोक्यातील क्रांतीचा रोमान्स गळू लागला. एका नव्या अनुभूतीने मी वैचारिकदृष्ट्या गंभीर होत गेलो. रहस्यवाद, अंधश्रद्धा या सगळ्याच्या पलीकडे पाहू लागलो.

विवेकवाद हाच जीवनाचा आदर्शवाद बनला. विश्वक्रांतीला चालना देणार्या आदर्शवादाचा अभ्यास केला. बाकुनिन, मार्क्स, लेनीन, ट्रोटस्की… सगळ्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशात क्रांती करणार्यांनाही समजून घेतलं. निरलंब स्वामींचं ‘सहज ध्यान’ हे पुस्तक हातात आलं. या सगळ्यातून लक्षात आलं की ही सगळी व्यक्तिमत्वं ही नास्तिक होती. १९२६ पर्यंतच्या माझ्या या प्रवासात माझ्या लक्षात एक गोष्ट आली की सर्व शक्तीमान परमात्माची कहाणी, विश्वनिर्मिती आणि विश्वाचं संचालन देव करतो ही गोष्ट एकदम बकवास आहे. माझ्या या विचारांना मी मांडू लागलो. माझ्या मित्रांशी याबाबत मी विचार विनिमय, चर्चा करू लागलो. मी नास्तिक म्हणून जाहीर झालो होतो…” 

भगतसिंग यांच्या शहीददिनानिमित्त  पुणे येथे खास नास्तिक मेळावा या निमित्ताने होत आहेत. आजच्या एकूण सर्व परिस्थितीत भगतसिंग यांचा वैचारिक वारसा जोपासण्याचा आणि नास्तिक विचाराला वैचारिक अधिष्ठान मिळवून देण्याचा हा खराखुरा प्रयत्न आहे. भगतसिंग यांना हेच खरं अभिवादन आहे ! 

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply