‘ती’चा स्वातंत्र्यलढा पुस्तकासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

You are currently viewing ‘ती’चा स्वातंत्र्यलढा पुस्तकासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

पुणे, 4 जून 2022

भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे पण अजूनही स्त्री स्वतःच्याच घरात स्वतंत्र नाही. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजही बहुतांश स्त्रियांना नाही. मात्र अशाही काही स्त्रिया आहेत ज्यांनी घरातील या विषमतेविरुद्ध आपल्याच घरात आप्तस्वकीयांसोबत बंड केलं आहे आणि स्वातंत्र्य मिळवलं आहे.

विशेषतः मासिक पाळीचा विटाळ न पाळण्याचे स्वातंत्र्य, सोबतच स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी ज्या महिलांनी आपल्याच घरी प्रेमाने पण निकराने लढा दिला अशा स्त्रियांचे अनुभव समाजबंध लिहून मागवत आहे. कोणी नक्की कसा, कधी व किती संघर्ष करून विटाळापासून, विषमतेपासून स्वातंत्र्य मिळवलं याची प्रक्रिया समोर येणं फार आवश्यक आहे. हे अनुभव लक्षावधी महिलांना अनुकरण करण्यासाठी प्रेरणादायी ठरतील. त्यातील निवडक अनुभवांचे संपादन करून पुस्तक प्रकाशित केले जाईल. उत्तेजनार्थ पाच लेखिकांचा- रागिनींचा जाहीर सन्मान प्रकाशन सोहळ्यात केला जाईल. निवड झालेल्या महिलांना पुस्तक व प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच इतर सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

वयाची, भाषेची कोणतीही मर्यादा नाही. या संघर्षात तसेच लिखाणात कोणाही व्यक्तीबद्दल द्वेष नसावा. ५०० ते १५०० शब्दात शक्यतो टाईप करूनच पण शक्य नसेलच तर सुवाच्य अक्षरात लिहून त्याचा फोटो contactsamajbandh@gmail.com वर पाठवावा. त्यासोबत आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, Email ID, संपर्क क्रमांक, शिक्षण, नोकरी/व्यवसाय/काय करता, स्वतःचा एक फोटो हे सर्व न विसरता त्यासोबत पाठवावे.

अंतिम दिनांक: ३० जून २०२२
लेख निवड निकाल : १० जुलै २०२२
पुस्तक प्रकाशन: १५ ऑगस्ट २०२२
अधिक माहितीसाठी: सचिन 7709488286

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply