शोध महामानवाचा लघुपट रविवारी रात्री प्रदर्शित होणार

You are currently viewing शोध महामानवाचा लघुपट रविवारी रात्री प्रदर्शित होणार

दि. 4 जून 2022

कोकणातील मिठमुंबरी गाव, देवगड तालुक्यातील अमोल अजब मुंबरकर नावाच्या तरुणांने कुठल्याही प्रकारचे तांत्रिक ज्ञान नसताना शालेय शिक्षण कमी असताना तसेच पुरेशी साधने उपलब्ध नसताना शोध मानवाचा हा सुंदर लघुपट तयार केला आहे.

केवळ मोबाईलवर चित्रीकरण करून तसेच आई व मुलाकडून अभिनय करून, सर्व जबाबदाऱ्या स्वतः पार पाडून अमोल मुंबरकर याने हा एक भारदस्त संदेश देणारा लघुपट तयार केला आहे.

येत्या ५जून २०२२ रोजी सायंकाळी ८वाजता हा लघुपट एम.पी.मुंबरकर प्रोड्युकॅशन युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होईल.

त्यात प्रामुख्याने शाहीर संभाजी भगत व विद्रोही कवी-सचिन डांगळे यांनी कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता, अमोलच्या या कलाकृतीला आपले मोलाचे योगदान दिले आहे. यामध्ये नंदेश उमप, कडुबाई खरात व नितेश मोरे यांच्या आवाजात खूप सुंदर अशी गाणी आहेत.तरी सर्वांनी आवर्जून बघावा असा मराठी लघुपट बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पेरीत झालेला तरुण आज आपल्या लघुपटाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने जिवंत कुठे सापडतील हे दाखवण्यासाठी धडपड करत आहे. हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply