आपला जागल्या 2 वर्षांचा झाला

You are currently viewing आपला जागल्या 2 वर्षांचा झाला

नमस्कार,

सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांच्या हक्काचे असलेले हे नवमाध्यम आज दोन वर्षे पूर्ण करून तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे.

जागल्या वेबपोर्टलच्या या दोन वर्षाच्या वाटचालीत अनेक सामाजिक संस्था, संघटना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक, मित्र-मैत्रिणींची साथ व पाठबळ लाभले. या सर्वांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

जागल्या वेब पोर्टल सार्वजनिक आरोग्य, उच्च शिक्षण-रोजगार या विषयांवर प्रामुख्याने कार्यरत आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल सक्षम झाली पाहिजेत, खाजगी हॉस्पिटलच्या उपचाराच्या दरांवर शासनाचे नियंत्रण असले पाहिजेत यासाठी जागल्याकडून सातत्याने वार्तांकन करण्यात येत आहे.

बॉम्बे नर्सिंग ऍक्टमध्ये बदल होऊन सर्व खाजगी हॉस्पिटलनी दर्शनी भागात उपचार सुविधांचे दरपत्रक लावणे 14 जानेवारी 2021 पासून बंधनकारक केले होते. मात्र याच्या अंमलबजावणीचा सर्वांना विसर पडला होता. त्याचा जागल्याने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावले जाऊन रुग्णांची फसवणूक टळू लागली आहे. येणाऱ्या काळात ही आरोग्याच्या प्रश्नांवर पत्रकारितेच्या माध्यमातून दीर्घकाळ काम करण्याचा मानस आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मांडण्याचे तसेच प्रशासनातील अनेक गैरव्यवहार उजेडात आणण्याचे काम जागल्याने केले आहे. विद्यापीठात फिरायला येण्यासाठी लावलेले मासिक हजार रुपये शुल्क रद्द करणे, अधिकाऱ्यांचे अतिरिक्त भत्ते रद्द करणे, तिथल्या गैरव्यवहारांची चौकशी लागणे असे अनेक इम्पॅक्ट झाले आहेत. कोणते ही एक बीट निवडून तिथले सखोल वृत्तांकन करून वेब पोर्टल सारखी नवमाध्यमे किती परिणामकारक पत्रकारिता करू शकतात याचा एक चांगला प्रयोग, उदाहरण म्हणून याकडे पाहता येऊ शकेल.

रोजगार हा सर्वात प्राधान्याचा विषय मानून तरुण-तरुणींच्या शिक्षण-रोजगार संबंधित प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. नेट-सेट पात्रताधारक, स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरतीची तयारी करणारे विद्यार्थी यांचे प्रश्न वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

रोजगार, उच्च शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर आणखी खूप सारे काम होण्याची आवश्यकता तीव्रतेने जाणवते आहे. आम्ही आमच्या परीने शक्य तितके प्रयत्न करतो आहोत.

आपण ही याला अधिक गती देण्यासाठी जागल्या परिवारात सहभागी व्हावे. जागल्याचे वर्गणीदार होऊन, जागल्याच्या विविध लेखमालिकांसाठी फेलोशिप, जाहिराती, देणगी देऊन आपले पाठबळ द्यावे असे आवाहन आम्ही करत आहोत.
ऐच्छिक वार्षिक वर्गणी, देणगी गुगल पे/फोन पे द्वारे 9922201192 या क्रमांकावर भरू शकता . पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

टीम जागल्या

संपर्क – 9922201192
ई-मेल – mejaglya@gmail.com

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply