पुण्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या संघटित प्रयत्नांना सुरुवात

You are currently viewing पुण्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या संघटित प्रयत्नांना सुरुवात

पुणे, दि. 11 सप्टेंबर 2022

जन आरोग्य अभियानच्यावतीने शनिवार, 10 सप्टेंबर रोजी शहरी आरोग्य या विषयावर पुणे व पिंपरी-चिंचवड येथील कार्यकर्त्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला 20 संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहिले.

यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवडची सार्वजनिक आरोग्याची सद्यस्थिती समजून घेऊन आवश्यक त्या बदलांसाठी कृती कार्यक्रम ठरविण्यात आला.

त्यामध्ये वस्ती पातळीवर ठिकठिकाणी मीटिंग घेणे, आपापल्या वार्डात सरकारी आरोग्य सुविधांची स्थिती काय आहे, किती बेड उपलब्ध आहेत, वैद्यकीय तपासण्या होतात का, आवश्यक ती औषधे मिळतात का याची माहिती गोळा करणे. जनतेचा आरोग्य जाहीरनामा तयार करणे, राजकीय पक्षांकडून आगामी महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेणे, प्रत्येक सरकारी दवाखान्यात नागरी रुग्ण हक्क कृती समित्या कार्यान्वित करणे आदी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

पुणे महापालिकेकडून पालिकेचे दवाखाने, तिथल्या उपचार सुविधा याबाबत प्रचंड हेळसांड वर्षानुवर्षे झाली आहे. आरोग्याला नेहमी कमी बजेट दिले गेले, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची 51 टक्के पदे रिक्त असून ती भरली जात नाहीत, एक आयसीयू विभाग अजून पुणे महापालिकेला त्यांच्या एका ही दवाखान्यात उभारता आलेला नाही, हे आपण 40 लाख पुणेकरांचे दुर्दैव आहे. परिणामी कोविडच्या काळात अनेक पुणेकरांना जीव गमवावा लागला आहे, हे विसरून चालणार नाही.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा मुद्दा प्राधान्याचा बनावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

जन आरोग्य अभियानात सहभागी होण्यासाठी संपर्क (दीपक जाधव – 9922201192)

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply