जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने जनजागृती

You are currently viewing जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने जनजागृती

पुणे, दि. 4 जून 2022

अभियान , मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पाटील इस्टेटमध्ये जन जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये, मुलांनी ‘व्यसनाधीनता’ या विषयाला अनुसरून पथनाट्य सादर केले, व्यसन मुक्तीसाठी प्रेरणा देणाऱ्या घोषणांचा गर्जनेत पाटील इस्टेटमध्ये जन जागृती रॅली काढण्यात आली. चित्रकला प्रदर्शनाने ही कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुलांशी संवाद साधत या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व येणाऱ्या काळात मुलं व्यसनी होऊ नये म्हणून प्रयत्नशील होऊ असे आश्वासन दिले.

व्यसनाधीनता या विषयावरील पथनाट्य सादरीकरण करताना


मॉडर्न कॉलेजच्या 70 मुलांनी यात भाग घेतला. प्रास्ताविक करताना डॉ. विष्णू यांनी सांगितले की तरुण पिढी व्यसनी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त सृजनशील व मुलांना आवडेल असे पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

याप्रसंगी, पाटील इस्टेट वस्तीमधील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोलंकी, रविंद्र साळेगावकर, माजी नगरसेविका आशाताई साने, प्रतिभाताई गायकवाड, शोभाताई झेंडे, अशिफभाई पटेल, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राध्यापक नामदेव डोके, मनोदय व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मैत्रेयी पाध्ये यांनी केले व आभार प्रदर्शन मृणाल जोशी-देशमुख यांनी केले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply