केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवणार – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

You are currently viewing केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवणार – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे दि. 29 एप्रिल 2023

पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वार्थापोटी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुलवामा व भारत-पाकीस्तानचा भावनिक मुद्दा उभा केला. सध्या चीनच्या घुसखोरीसह दहशतवादी हल्ले थांबवण्यात मोदी सरकार अपयशी नव्हे तर दोषी ठरले असा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परीषदेत केला. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांविरोधात पुणे शहरात नागरी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ४१ आरसीएफ जवानांच्या शहीदत्वावर मोदींच्या भाजपने मते ही मागितली, मात्र सुरक्षेच्या अक्षम्य चुकांमुळे हा दुर्दैवी हल्ला झाला. अडाणी आर्थिक घोटाळ्यावर संसदेत उत्तरे न देणे, राष्ट्रीय संपत्ती मनमानीपणे निवडक उद्योजकांच्या घशात घालणे, राष्ट्रीय बँकांची करोडोची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई न करणे आदी गैरप्रकार भाजपा सरकारने केले आहेत.

देशात अण्णा हजारेंच्या आंदोलनातून खोटे नाटे आरोप व ‘अच्छे दिन’ची स्वप्ने, काळा पैसा आणून प्रत्येकी १५ लाख, प्रती वर्षी २ करोड रोजगार इ. भरमसाठ लोभस आश्वासने देऊन सत्तेवर आलेले सरकार आता मात्र लोकशाही व संविधानीक मुल्यांना तिलांजली देत अधर्माकडे वाटचाल करत आहे.

त्यामुळे याबाबत आवाज उठवण्यासाठी लवकरच पुणे शहरात केंद्र सरकारच्या गैर कर्त्यांविरोधात नागरी स्वाक्षरी मोहिमेचे राजीव गांधी स्मारक समितीकडून आयोजन केले जाणार आहे अशी माहिती गोपाळ तिवारी यांनी दिली.

याप्रसंगी सुर्यकांत मारणे, सुभाषशेठ थोरवे, ॲड संदीप ताम्हणकर, युक्रांदचे संदिप बर्वे, आबा तरवडे, रामचंद्र शेडगे, भोला वांजळे, नंदूशेठ पापळ, प्रसन्न पाटील, संजय चौगुले, केदार गोराडे, महेश अंबिके, अशोक काळे, घनश्याम निम्हण, मंगेश झोरे, धनंजय भिलारे, रमाकांत शिंदे, विकास दवे, नरेश आवटे, उदय लेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply