नागपूर चाळीतील मनोदय संस्थेच्या चित्रकला मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

You are currently viewing नागपूर चाळीतील मनोदय संस्थेच्या चित्रकला मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

पुणे, 9 मे 2023

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ/हौसिंग बोर्ड, गांधीनगर/जयप्रकाश नगर व रमाई आंबेडकर नगर पुणे स्टेशन ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी
समाज सुधारकांच्या विचारातील समाज आणि युवक या विषयाला अनुसरून वेगवेगळी ६४ चित्रे काढली.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संस्था वस्ती मधील तरुणांसोबत काम करते. चित्र काढलेल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. त्या प्रसंगी बोलताना गौतम बुद्धांचे पंचशील तत्व सांगत समाजातील अंधश्रद्धा, विवेकनिष्ठ दृष्टिकोन, महिलांचे प्रश्न आणि त्यांची ताकद इ मुद्दे मांडत देशातील तरुणाई पुढील आव्हाने आणि संधी यावर भाष्य केले.

या उपक्रमात तिन्ही वस्तांमधून ३६ मुलांनी व मॉडर्न महाविद्यालय, गणेश खिंडच्या ३० मुलांनी इंटर्नसिप म्हणून या कार्यक्रमात सहभागी घेतला.


या कार्यक्रमाला, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, समुपदेशक अक्षय कदम, विभा नकाते, अपूर्वा कुलकर्णी कार्यक्रमाचे समन्वयक मैत्रेयी पाध्ये आणि संघटक काजल रणसुरे व संध्या सर्वगोड उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply