मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

You are currently viewing मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

जागल्या प्रतिनिधी : पुणे, 16 ऑगस्ट 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना मनोदय व्यसनमुक्ती संस्थेने पाटील इस्टेट ( शिवाजी नगर) व गांधीनगर, जयप्रकाश नगर, नागपूर चाळ ( येरवडा) इथे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

मनोदय व्यसनमुक्ती संस्था ही वस्ती पातळीवर तरुण पिढी व्यसनी होऊ नये म्हणून कार्य करत आहे. दिनांक १४ ऑगस्ट, रविवार रोजी वस्ती पातळीवर मेहेंदी, रांगोळी, हस्ताक्षर, वकृत्व, गायन, कविता लेखन अश्या विविध स्पर्धा घेतल्या गेल्या. यात तिन्ही केंद्रामधून एकूण ११४ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. ह्या स्पर्धा घेण्यामागचा मुख्य उद्देश विदयार्थ्यांना त्यांचे सुप्त कलागुण समजावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि नावीन्यपूर्ण विचार क्षमतांचा वाव मिळावा हा होता.


कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून अलका निकम, धर्मा पडाळकर, डॉ. नंदा अनिलकुमार मुने (ग्रीनतारा फौंडेशन) यांनी जबाबदारी सांभाळली आणि आवश्यक मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यदिनाच्या व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे उपसंपादक उद्धव धुमाळे व पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संचालिका नेहा महाजन ह्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या सर्वांची देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणिव करुन देत त्यांना ते साध्य करण्याचे मार्ग यातून सुचवले. गांधीनगर, येरवडा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सुकाळे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवांचे कथन करत मनोदयमुळे त्यांचा दैनंदिन आयुष्यात काय फरक झाला ते सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्व-रचीत कविता, देश भक्तीपर गीते आणि नृत्य सादर केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे पदाधिकारी प्रज्ञा जाधव ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा हावळे ह्यांनी केले. ह्या प्रसंगी मनोदय संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णु श्रीमंगले, या कार्यक्रमाचं समन्वयक मैत्रेयी पाध्ये, समुपदेशक अक्षय कदम, समृध्दी साळवी तसेच प्रवीण कुमार व सुदर्शन चखाले उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply