मोदी-शहा-फडणवीसांना ‘सत्तेची मस्ती’, गैरमार्गाचा वापर करून आमदारांची फोडाफोडी – गोपाळ तिवारी

You are currently viewing मोदी-शहा-फडणवीसांना ‘सत्तेची मस्ती’, गैरमार्गाचा वापर करून आमदारांची फोडाफोडी – गोपाळ तिवारी

पुणे, दि १६ एप्रिल 2023

भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाच्या सदस्यांची घाऊक खरेदी करण्याची व सरकारी आयुधे वापरून, त्यात वेळ व शक्ती खर्च करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. पछाडलेल्या भाजपचा देशातील सत्ताकाळ २०२४ मध्ये संपुष्टात येईल, त्यामुळे मोदी-शहा-फडणवीसांच्या ‘सत्तेची मस्ती’ अजून वर्षभर जनतेस सहन करावी लागेल अशी टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

“जनतेप्रती कर्तव्य तत्पर व उत्तरदायी होऊन, दिलेली आश्वासने पूर्ण करून, वाढत्या महागाई व बेरोजगारीच्या समस्या दूर करून स्वपक्षाचा जनाधार व विश्वसनियता वाढवण्याऐवजी जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, तरुणांच्या प्रश्नांना क्षमतेने सामोरे जाण्याचे टाळून भाजप विरोधी पक्षांना त्रास देण्याचे काम करत आहे असे तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

असंवैधानिक, न्यायप्रविष्ठ सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मविआतील आमदार भाजपमध्ये येण्याच्या वक्तव्याचा समाचार तिवारी यांनी घेतला.

राज्य सरकार तर्फे दिला जाणाऱ्या महाराष्ट्र भुषण’ पुरस्कारांच्या सरकारी खर्चाने होत असलेल्या जाहीरातींमध्ये तसेच कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्ष नेत्याचे नाव व उल्लेख नसणे ही सरकारची नैतिक दिवाळखोरी असल्याची टीका तिवारी यांनी केली.

विरोधी पक्षांची टिका ही सत्तापक्षाच्या कामकाजामध्ये सुधारणा होण्यासाठीच असते. लोकशाहीत सत्तेवर आल्यावर लोकहीताची कामे करणे व दिलेली आश्वासने पूर्ण करणे व विरोधकांस टिकेची संधी न देणे हेच खरे राजधर्माचे पालन करणे असते.

देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्यात व लूट थांबवण्यात सपशेल वा जाणीवपूर्वक अपयशी ठरलेल्या भाजपने सूडबुद्धीने 7 राज्यातील सरकारे केंद्रातील महाशक्तीच्या जोरावर पाडली आहेत.

वास्तविक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा खाली, सलग (२०१४ ते १९) ५ वर्षे सत्ता राबवलेल्या भाजपला, राज्यातील जनतेने २०१९ ला आहे तेवढ्या (१२६) जागेचा कौल देखील दिलेला नाही, हे त्या वेळीच स्पष्ट झाले.

२०१४ मध्ये १२६ जागा मिळवणाऱ्या भाजपला २०१९ ला मात्र १०५ जागा मिळाल्या मात्र त्यातही प्रथम पासुन भाजपचे असलेले सु ८० आमदारच आले, व (काँग्रेस-राष्ट्रवादी’ते प्रस्थापित २६ आमदार हे निवडणुकीचे तोंडावर (२०१९ मध्ये भाजपवासी झाले). भाजपाकडे या २६ ची आमदारांची भर पडून देखील ते १०३ च्या पुढे जाऊ शकले नाही हा भाजपचा नैतिक पराभव होता.

सत्ता काळातील पापकृत्यांमुळे संभाव्य शिक्षा-कारावास टाळण्यासाठी अहंकारी वृत्तीने सत्तेतच रहाण्याच्या प्रयत्नात भाजपा देशाचे अपरिमित नुकसान करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply