इंदिरानगरमध्ये ज्ञानतपस्वी वाचनालयाचे उदघाटन

You are currently viewing इंदिरानगरमध्ये ज्ञानतपस्वी वाचनालयाचे उदघाटन


पुणे, दि. 14 एप्रिल 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औंध येथील इंदिरा वसाहत येथे ज्ञानतपस्वी वाचनालाय सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दत्ताभाऊ रणदिवे यांच्या पुढाकारातून या वाचनालयाची सुरूवात झाली आहे.

चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कोळी, मनसेचे राज्य सरचिटणीव सरचिटणीस रणजित शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे, भाजपचे पदाधिकारी सचिन मानवतकर, प्रमोद कांबळे, आनंद खैरे, जनाई रणदिवे, दीपक जाधव यावेळी उपस्थित होते.

दत्ताभाऊ रणदिवे यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेब यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा नारा दिला. त्यापासून प्रेरणा घेऊन वस्तीमधील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी या वाचनालयाचे रोपटे लावले आहे”

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, मनसेचे राज्य सरचिटणीस रणजित शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे, भाजपचे पदाधिकारी सचिन मानवतकर यांनी दत्ताभाऊ रणदिवे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply