शिक्षक दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात सलील कुलकर्णी…

जागल्या (प्रतिनिधी) दि. ४ सप्टेंबर,
शिक्षक दिनानिमित्त (Teacher’s Day) यंदा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे ज्येष्ठ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाजालावरून साभार…

5 सप्टेंबर रोजी संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता हा दिमाखदार सोहोळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी माध्यमांना दिली. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.

एक संवेदनशील लेखक, गायक, संगीतकार म्हणून नावाजलेले सलील कुलकर्णी यांचा‘एकदा काय झालं’हा शिक्षण व्यवस्थेवर वेगळे भाष्य करणारा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला आहे. या माध्यमातून डॉ. कुलकर्णी विद्यार्थी, शिक्षक यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. या प्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत आपल्या कामाचा चांगला ठसा उमटविणाऱ्या काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि अन्य संस्था सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे प्राचार्य मलघे यांनी सांगितले.

……

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply