एकनाथ ढोले यांची आम आदमी पक्षाच्या शहर संघटक पदी नियुक्ती

You are currently viewing एकनाथ ढोले यांची आम आदमी पक्षाच्या शहर संघटक पदी नियुक्ती

पुणे, दि. 30 एप्रिल 2022
शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष, माजी विभागप्रमुख एकनाथ ढोले यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपच्या शहर संघटक पदी त्यांची निवड करून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आहे.

यावेळी राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे, पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, पुणे शहर निवडणूक प्रचार प्रशासन समितीचे सुदर्शन जगदाळे, विकास सुपणार, पियूष हिंगणे उपस्थित होते.

एकनाथ ढोले हे गेली ३२ वर्षांपासून शिवसेनेचे सक्रीय पदाधिकारी आहेत. ते शिवसेनेमध्ये गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी २०१७ साली शिवसेनेकडून पुणे मनपा निवडणूक लढवली आहे.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply