पुणे महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा, अर्थसंकल्पात अपुरी तरतूद

You are currently viewing पुणे महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा, अर्थसंकल्पात अपुरी तरतूद

विवेक वेलणकर

पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तयार केला. गेल्या वर्षीपेक्षा तो १५% नी फुगवण्यात येऊन यंदाचा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटी रुपयांचा करण्यात आला. मात्र शहरी गरीब पासून विविध योजनांमध्ये लागणाऱ्या औषधांवरील अर्थसंकल्पीय तरतूद मात्र आयुक्तांनी अकारण कमी केली.

कालच्या माहिती अधिकार दिनात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी औषधांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होती  ती  तरतूद यंदा ४० % नी घटवून ६ कोटी रुपये करण्यात आली.

करोना महामारीच्या अभूतपूर्व संकटातून गेल्यानंतरही अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो हे संतापजनक आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक औषधांचा तुटवडा या महिन्याच्या सुरवातीपासूनच जाणवू लागला आहे, रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणावी लागत आहेत. आता यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले असून  औषध खरेदी करण्यासाठी अन्य अर्थसंकल्पीय तरतूदींमधून वर्गीकरण करुन यासाठी बजेट उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता हे वर्गीकरण होऊन प्रत्यक्षात औषधे उपलब्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल.

अर्थसंकल्पात औषधांसारख्या जीवनावश्यक गोष्टींवरची तरतूद ४० % ने कमी करण्याचे धाडस होतेच कसे याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे.

विवेक वेलणकर,
अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे
संपर्क – 9850063480

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply