आवाज रुग्णांचा हेल्पलाईन : प्रश्न तुमचे, उत्तर साथीचे

You are currently viewing आवाज रुग्णांचा हेल्पलाईन : प्रश्न तुमचे, उत्तर साथीचे

पुणे, दि. 17 मे 2022

कुटुंबातील एखाद्या सदस्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आलीच तर संपूर्ण कुटुंबावर प्रचंड ताण येतो. हॉस्पिटल व औषधांचा भरमसाठ खर्च, त्यासाठी करावी लागणारी धावपळ, वैद्यकीय उपचाराच्या शासकीय योजनांची माहिती नसणे अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अशावेळी आता एका फोनवर याबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून मिळू शकणार आहेत.

साथी संस्थेने यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला असून याबाबत मदत, मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईन क्रमांक 9422328578 हा आहे. ही सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत उपलब्ध असणार आहे.

राज्यभरातून कुठून ही या हेल्पलाईनवर फोन करता येऊ शकणार आहे

हॉस्पिटलमधील पेशंटचे हक्क, योजना, मोफत किंवा कमी खर्चात उपचार व तपासण्या, हॉस्पिटलमधील तक्रारी सोडवण्यासाठीची माहिती, मदत मार्गदर्शन साथीकडून करण्यात येईल.

साथी हेल्पलाईन- 9422328578
(सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)

“वीस टक्के व्याजाने पाच हजार उचलले काल… आज डिचार्ज करायचाय, नगरसेवकाचं पत्र द्या म्हणलेत दवाखान्यात.” ही कहाणी आपल्या सर्वांच्याच घरातली. आज नाही कर उद्या अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. एकतर कर्ज काढून उपचार करा, नाहीतर कुणाच्या तरी हातापाया पडा. अशा प्रसंगी आता साथीच्या हेल्पलाईनची मदत होऊ शकणार आहे.

साथी हेल्पलाईन- 9422328578
(सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)

साथी हेल्पलाईनचा हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि अडचण आल्यावर नक्की फोन करा. आज तुम्हाला याबाबत माहिती मिळाली की पुढे तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकाल.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Urmila devadiga

    आम्ही या आरोग्य योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत करू