मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन

You are currently viewing मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन

पुणे, दि. 25 मे 2022

सामाजिक कार्यकर्ते संतोष सुकाळे व जय गणेश प्रतिष्ठान गांधी नगर यांच्या सहकार्याने मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे तिसरे केंद्र नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. गांधीनगर, जयप्रकाश नगर येथे नुकतेच संस्थेच्यावतीने पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते.

वस्तीमध्ये व्यसनाधीनता बाबत जाणीव जागृतीसाठी सहा ठिकाणी पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते. संस्थेच्या वतीने व्यक्तिगत व गट समुपदेशन, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस नियमित बैठका घेतल्या जातात. तसेच वस्ती पातळीवर १४-२२ वयोगटातील मुलां-मुलींनी व्यसनी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.

करीयर मार्गदर्शन, खेळ, मानसिक आरोग्य उपचार पद्धती, राग नियंत्रण, संवाद, वैचारिक उंची वाढवण्यासाठी व्याख्याने, पोलीस भरती मार्गदर्शन तसेच विविध चाचणी परीक्षा आणि त्यानुसार मार्गदर्शन केले जाते. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, समुपदेशक अक्षय कदम, संघटक प्रिया सोनवणे आणि जय गणेश प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply