हाडाचे शिक्षक प्राचार्य डॉ.पी.एन.शेंडे सेवानिवृत्त

You are currently viewing हाडाचे शिक्षक प्राचार्य डॉ.पी.एन.शेंडे सेवानिवृत्त

डॉ. ए. पी. कुलकर्णी

प्राचार्य डॉ.पी.एन.शेंडे तथा पांडुरंग नरहरी शेंडे नियत वयोमानानुसार प्राचार्य म्हणून सरस्वती मंदिर नाईट कॉलेज येथून दिनांक 19 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.

प्राचार्य शेंडे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तयार झालेले नेतृत्व आहे. आजही त्यांच्या मूळ गावी मु. पो.वरकुटे खुर्द ,तालुका इंदापूर ,जिल्हा पुणे ,या ठिकाणी साधी एस.टी. बस देखील जात नाही.त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे इ.7वी पर्यंत याच गावात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण इ.10 वी पर्यंत इंदापूर बारामती रोड वर असणाऱ्या निमगाव केतकी येथे मराठी माध्यमातून झाले इ.11वी ते वाणिज्य पदवीधर शिक्षण इंदापूर महाविद्यालयात झाले. चार-पाच मित्रात खोली करून राहून घरून एस.टी.ने जेवणाचा डबा येत असे.

गावी वडिलांना शेती व्यवसायत मदत करून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केत्यानंतर बारामती येथे पदवीत्तर शिक्षण म्हणजेच एम. कॉम.वस्तीग्रहात राहून घरून जेवणाच्या डब्याची सोय एस.टी.ने करून प्रथम श्रेणी मध्ये पूर्ण केले. खरे तर त्यांचे शिक्षण हे त्यांच्या आवडी प्रमाणे किंवा निवडी प्रमाणे न होता जशा शैक्षणिक सुविधा आणि सोयी उपलब्ध होतील त्याप्रमाणे तेथे शिक्षण त्यांनी घेतले.

आज त्यांच्या कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब मध्ये जवळ जवळ सहा व्यक्ती सरकारी नोकरीत आहेत व दोन व्यक्ती यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही सुविधा नसताना खडतर प्रयत्नातून शिक्षण पूर्ण केले त्यांचा वसा आणि वारसा त्यांचे पुतणे आणि मुलांनी पुढे घेतला.

एम. कॉम.नंतर उरळी कांचन येथील महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये दोन वर्ष प्राध्यापकाची नोकरी केली त्यानंतर येरवडा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काही वर्ष पूर्ण केल्या नंतर पुण्यातील प्रसिद्ध प्रसिद्ध आणि प्रतीतयश बी. एम. सी. सी.महाविद्यालयामध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आणि अकाउंटन्सी विभागाचे ,विभाग प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. याच महाविद्यालयात ते पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून जबाबदारी पार पाडली.

त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई येथील दादर येथे असणारे कीर्ती महाविद्यालयांमध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून चार वर्ष सेवा केल्यानंतर दिनांक 20 मे 2017 रोजी पुणे येथील बाजीराव रोड वरील सरस्वती मंदिर नाईट कॉलेज येथे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. या महाविद्यालयात ते रुजू झाले तेव्हा सातशे विद्यार्थी संख्या होती. आज ही विद्यार्थी संख्या चौदाशे पर्यंत आहे. त्यांच्याच काळामध्ये महाविद्यालयाला बेंगलोर येथील NAAC संस्थेने बी ग्रेड बहाल केली.

महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.शेंडे यांचा उल्लेख लोकप्रिय एक शिस्तप्रिय संशोधनप्रिय आणि उपक्रमशील प्राचार्य असा केला जातो. त्यांचेच काळामध्ये महाविद्यालयामध्ये अनेकविध उपक्रम यशस्वीपणे पार पडले.

प्रामुख्याने बहि:शाल शिक्षण, आजीवन अध्ययन विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, सांस्कृतिक विभाग, प्राध्यापक प्रबोधिनी इत्यादी मार्फत अनेक उपक्रम राबविले विद्यार्थ्यांसाठी खेळांच्या विविध सांघिक स्पर्धा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या, राज्यस्तरीय केशवसुत काव्य स्पर्धा आणि कार्यशाळा हा उपक्रम सातत्याने तज्ञ व्यक्तीं उपस्थित घेण्यातआला, विद्यार्थ्यासाठी आंतरविद्याशाखीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .या चर्चासत्रास डॉ. विजय नारखेडे, शिक्षण सहसंचालक, पुणे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयावर वाद विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विचार विनिमय करण्यासाठी राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .

राज्यभरातून 300 पेक्षा जास्त प्रतिनिधी, 50 प्राचार्य ,2 प्रकुलगुरू शिक्षण तज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विचार मंथन दिवसभर करण्यात आले

मी त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष, प्राध्यापक संघटनेचा, संस्थाचालकांचा माजी पदाधिकारी म्हणून मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

डॉ. ए. पी. कुलकर्णी
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट माजी सदस्य, नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विद्यमान व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत.)

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply