बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या मुलींची बाजी 

You are currently viewing बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या मुलींची बाजी 

पुणे (तळेगाव दाभाडे) दि. ८ जून २०२२

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींनी यंदाही गतवर्षीप्रमाणे तीनही शाखांमध्ये बाजी मारली. महाविद्यालयाचा बारावी विज्ञान विभागाचा निकाल 95. 86 टक्के, वाणिज्य 94.72 टक्के, तर कला शाखेचा निकाल 79.24 टक्के लागला. 

तेजश्रीराजे पानसकर हिने 90.83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

विज्ञान शाखेत

द्वितीय क्रमांक शिवानी सुनील वाघमारे हिने 90.50 टक्के गुण मिळवत, तर

सुप्रिया चव्हाण गणपत व ओंकार  मुंजाजी लोणसाने यांनी 85.50 टक्के गुण मिळवत

तिसरा क्रमांक पटकावला.

वाणिज्य शाखेत

रिया भेगडे हिने 90 टक्के गुण मिळवत प्रथम,

तिळक सुनारने 89 टक्के गुणांसह दुसरा, तर 

अमरीश येलबाईने 88.50 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला 

कला शाखेत

श्यामल मोधवे हिने 81.67 टक्के गुण पटकावत प्रथम,

रिया बाजारे हिने 79.17 टक्के गुण मिळवत दुसरा, तर

आकांक्षा गोबी हिने 77 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी, पालक यांनी  गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.  

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी, पालक यांनी  गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.  

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply