सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांकडून शैक्षणिक संवाद उपक्रमास सुरुवात

You are currently viewing सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांकडून शैक्षणिक संवाद उपक्रमास सुरुवात

पुणे, दि. 10 एप्रिल 2022

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांनी एसपीटी शिक्षक संघटनेमार्फत शैक्षणिक संवाद  (Academic Dialogue Initiative) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधनावर सादरीकरण व चर्चा केली जाते. महिन्यातून दोन वेळा हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यामुळे कॅम्पसमध्ये आंतरविद्याशाखीय संवाद घडून येऊ लागला आहे.

या उपक्रमांतर्गत दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक राजेश गच्चे  यांच्या “अन्नपदार्थ आणि कर्करोग” या विषयावरील संशोधनावर वनस्पतीशास्र विभागाच्या संग्रहालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाच्या प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख श्रद्धा  कुंभोजकर यांनी केले. या विषयाची मांडणी प्राध्यापक गच्चे यांनी खास मराठी आणि इंग्रजी द्विभाषिक पद्धतीने केली.

आज लोकसंख्या वाढीमुळे सेंद्रिय पद्धतीने अन्न निर्मिती करणे परवडत नाहीत.  विविध रसायनांचा आणि विषारी औषधांचा वापर करून भरमसाठ उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करून उत्पादन केलेले अन्नधान्य आणि भाजीपाला  घेण्याकडे शिक्षित लोकांचा कल वाढतो आहेत.  

कर्करोग होण्याचे अनेक कारणे असून आतापर्यंत दोनशे प्रकारचे कर्करोग जगभर नोंदले गेले आहेत. अन्नपदार्थाचे असंख्य रेणू (Molecule)  आणि कर्करोगाच्या पेशीं यांच्यातील आंतरक्रिया-प्रतिक्रियेबद्दल प्राध्यापक गच्चे यांनी अनेक शास्रीय उदाहरणांसह मजेदार चुटकुले व गोष्टी सांगत विश्लेषण केले. त्यातील भारतीय परंपरेतील एक किस्सा त्यांनी सांगितला की,  उपवास करण्याची परंपरा आपल्याकडे फार जुनी आणि आरोग्यदायीपण आहे.

उपवास हा कर्करोग दूर करण्यास कसा मदत करतो, हे त्यांनी शास्त्रीयप्रक्रियेसह उकल करून स्पष्ट दाखविले.  हळद, ब्रोकली असे अनेक पदार्थ कर्करोग दूर करण्यास मदतगार आहेत, याचे महत्त्व त्यांनी अधोरेखीत केले.

जगभरात किती संशोधन संस्था या क्षेत्रात कार्यरत आहेत, कोणते संशोधन विषय ट्रायलवर आहेत याचाही आढावा प्राध्यापक गच्चे यांनी त्यांच्या व्याख्यानात घेतला. या कार्यक्रमास अनेक तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राध्यापक गच्चे  यांनी समर्पक भाषेत उत्तरे दिलीत.

प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी  आभार मानले. पुढील शैक्षणिक संवाद कार्यक्रमाची माहिती लवकरच कळवली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जागल्या परिवारात सहभागी व्हा
जागल्या वेब पोर्टल हे लोकवर्गणीतून चालवले जाते. सार्वजनिक आरोग्य, उच्च शिक्षण-रोजगार हे विषय येथे प्राधान्याने मांडले जातात. आपण जागल्याचे ऐच्छिक वर्गणीदार (200 रु, 500 रु,1000 रु) होऊन आमच्या पत्रकारितेला आपले पाठबळ द्यावे. ऐच्छिक वार्षिक वर्गणी, देणगी गुगल पे/फोन पे द्वारे 9922201192 या क्रमांकावर भरू शकता.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply