‘स्वप्नवासवदत्तम’ सांगितीक नृत्यनाटिकेने जिंकली मने

You are currently viewing ‘स्वप्नवासवदत्तम’ सांगितीक नृत्यनाटिकेने जिंकली मने

पुणे, दि. 4 एप्रिल 2023

मेधा फाउंडेशन प्रस्तुत आणि कथा बिरादरी निर्मित “स्वप्नवासवदत्तम” या सांगितीक नृत्यनाटिकेचा प्रयोग विवेकानंद सभागृह, एमआयटी, कोथरुड, पुणे इथे संपन्न झाला.

महाकवी भास यांनी सुमारे २००० वर्षांपूर्वी “स्वप्नवासवदत्तम” हे मूळ संस्कृत नाटक लिहिले आहे. शृंगार, देशभक्ती, राजनीति, त्याग अशा अनेक भावनांचा मिलाप “स्वप्नवासवदत्तम”मध्ये आहे. डॉ. सुनील देवधर यांनी त्याचं हिंदी रूपांतरण केलं आहे. गीत, काव्य आणि नृत्य यांचा संगम असलेल्या या नृत्यनाटिकेची संकल्पना, प्रस्तुती आणि दिग्दर्शन कथक नृत्यांगना मुग्धा पोतदार पाठक यांचे आहे. पारंपरिक कथक नृत्य आणि समकालीन शैली यांचा संगम त्यांनी यात केला आहे. निखिल महामुनी आणि आमोद कुलकर्णी यांनी संगीत निर्मिती केली आहे, महालक्ष्मी अय्यर, योगिता गोडबोले आणि निखिल महामुनी यांनी पार्श्वगायन केलं आहे. रंगमंच व्यवस्था श्याम भुतकर यांची आहे.


प्रयोगाआधी, मेधा फाउंडेशनतर्फे श्रीराम गोविंद बेडेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ कीर्तनकार, चारुदत्त आफळे यांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नाट्यकर्मी, शेखर सेन, माजी आमदार मेधा कुलकर्णी, श्री. उल्हासदादा पवार आणि अनेक मान्यवर आणि स्नेही कालच्या प्रयोगाला उपस्थित होते. “स्वप्नवासवदत्तम”चे अधिकाधिक प्रयोग व्हावेत असे आशीर्वाद त्यांनी कलाकारांना दिले. पूनम छत्रे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply