पुणे, दि. 30 मे 2022
कोव्हिड १९ ची जागतिक महामारी व त्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारीसाठी येत असलेले अडचणी लक्षात घेऊन डॉ. विक्रम गायकवाड यांनी युवा परिवर्तन मंच (Youth Transformation Forum) ची सुरुवात केली. गावाकडच्या मुला-मुलींनी आयएएस व आयपीएस बनले पाहिजे या ध्येयाने ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले.
यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण बारा (१२) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व आठ (८) विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन अशा एकूण 20 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उपक्रम राबविला. त्यातील दोन विद्यार्थ्यांनी आज लागलेल्या निकालामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्याबरोबरच कोचिंग देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
देशभरातील आयएएस व आयपीएस अधिकारी वर्गाने या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग घेतले.
प्रथमच ही वेगळी व नाविन्यपूर्ण कार्यप्रणाली राबविण्यात आली. त्याला आज चांगले यश मिळाले आहे.

सोमवारी लागलेल्या निकाला मध्ये अंजली शोत्रिय (४४) व सोहम सुनील मांडरे (२६७) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
डॉ. विक्रम गायकवाड यांचे पुण्यात शनिवार वाड्याजवळ क्लिनिक आहे. आपल्या क्लिनिकचे काम सांभाळून ते हा उपक्रम राबवित आहेत. कोणतेही आर्थिक पाठबळ, मोठी साधनं हाताशी नसताना डॉ. विक्रम गायकवाड यांनी समाजातून पैसे उभे करून हे घडवून आणले आहे.
या विद्यार्थ्यांचे तसेच डॉ. विक्रम गायकवाड व युवा परिवर्तन मंचच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.