आरोग्य हक्कांसाठी एकत्र येण्याचा कोल्हापूर, इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला निर्धार
महापालिका, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद स्तरावर हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी मांडण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची माहिती यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आली. आपापल्या जिल्ह्यांच्या स्तरावर या समित्या स्थापन होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.