सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटास सुरुवात

You are currently viewing सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटास सुरुवात

पुणे, दि. 13 एप्रिल 2022

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटास मंगळवार, दि. 12 एप्रिल 2022 रोजी सुरुवात करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. मात्र कोविड काळात गेली सव्वा दोन वर्षे कॅम्पस विद्यार्थ्यांविना बंद राहिले. आता कॅम्पस पुन्हा सुरू झाले आहे, यापार्श्वभूमीवर आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अभ्यास गटाचा उपक्रम सुरू केला आहे.

विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागामध्ये प्रवेश घेऊन नव्याने कॅम्पसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या विद्यार्थ्यांना शक्य ती मदत करणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम या अभ्यास गटामार्फत केले जाणार आहे.

या अभ्यास गटामार्फत कॅम्पसमध्ये दर 15 दिवसांनी वैचारिक चर्चा, व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

आजी-माजी विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटाची पहिली बैठक मंगळवारी पार पडली

मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळणे, शुल्कवाढ रिफेक्ट्री आदींबाबतच्या अडचणी मांडल्या.त्या सोडवण्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांकडून पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीला विद्यानंद नायक, दीपक जाधव, सतीश पवार, कमलाकर शेटे, महावीर साबळे, श्रीकांत मिश्रा, सुरेश देवढे, राजेश नांगरे, शिवाजी मोटेगावकर, राजेंद्र भोईवार, मारुती अवरगंड, तुषार काकडे, जयंत चव्हाण, रवींद्र खोरडे, ओमप्रकाश अदमवाड, ओम बोडाले, रोहन रोकडे, वैष्णवी पाटील, राजश्री अनारसे, अद्वैत पाटील, ज्ञानेश शेळके, अविनाश बेंडनले, विष्णू श्रीमंगले आदी आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

आजी-माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

आजी-माजी विद्यार्थी अभ्यास गट
संपर्क – विद्यानंद 992244 6888, सतीश – 7387414832, दीपक – 9922201192

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply