सहायक सुरक्षा अधिकारी भुरसिंग रजपूत सेवानिवृत्त

You are currently viewing सहायक सुरक्षा अधिकारी भुरसिंग रजपूत सेवानिवृत्त

पुणे, दि. 30 जून 2022

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 6 कुलगुरूंचे अंगरक्षक म्हणून काम पाहिलेले सहायक सुरक्षा अधिकारी भुरसिंग अजितसिंग रजपूत 32 वर्षांच्या सेवेनंतर आज विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले.

महाराष्ट्र शुगर मिल, होमगार्ड विभाग, प्रवरा एज्युकेश सोसायटी येथे काही काळ सेवा केल्यानंतर 1991 मध्ये भुरसिंग रजपूत पुणे विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत झाले. त्यांनी डॉ. निगवेकर, डॉ. गोवारीकर, डॉ. गायकवाड, डॉ. कोळस्कर, डॉ. जाधव आदी 6 कुलगुरूंचे अंगरक्षक म्हणून काम केले.

विद्यापीठामध्ये 32 वर्षांची सेवा बजावून ते आज निवृत्त होत आहे. सुरक्षा विभागाचे संचालक व निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply