कुलसचिवांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर निनावी पत्राद्वारे करण्यात आलेले आरोप खूपच गंभीर आहेत. जागल्या वेब पोर्टलच्या पडताळणीमध्ये त्यातील काही आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळून आले आहे.