एक वर्तुळ पूर्ण झाले, त्याचबरोबर जबाबदारी ही खूप वाढली

You are currently viewing एक वर्तुळ पूर्ण झाले, त्याचबरोबर जबाबदारी ही खूप वाढली

दीपक जाधव

वंचित घटकातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या. त्यासाठी तत्कालीन समाजातील काही लोकांकडून फेकलेल्या दगड-धोंडे आणि शेण-मातीचा त्यांना सामना करावा लागला. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात यायला काही दशकं जावी लागली.

त्यानंतर समाजातून झालेल्या आग्रहामुळे, मागणीमुळे 9 ऑगस्ट 2014 रोजी पुणे विद्यापीठाला तत्कालीन राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले.

आज सात वर्षांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण झाले, अन एक वर्तुळ पूर्ण झाले.

मात्र पुतळा उभा करून समाजाची आणि विद्यापीठाची ही जबाबदारी संपली नाही. उलट आता वंचित घटकातील मुला-मुलींना विनासायास उच्च शिक्षण मिळेल याकडे त्यांना अधिक लक्ष द्यावे लागेल.

ज्ञानमाऊली सावित्रीबाई फुले यांना जागल्या परिवाराकडून विनम्र अभिवादन.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply