पुणे, दि. 18 मे 2022
मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त नागपूर चाळ येथील लुंबिनी उद्यानात चित्रकला मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी पाटील इस्टेट, नागपूर चाळ, हौसिंग बोर्ड, गांधीनगर, जयप्रकाश नगर ह्या वस्तीत राहणाऱ्या तरुण मुला-मुलींनी ‘व्यसनाधीनता’ या विषयाला अनुसरून वेगवेगळी चित्र काढली.
चित्र काढलेल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते. त्या प्रसंगी बोलताना बुद्धांचे पंचशील तत्व सांगत त्या तत्वांपैकी व्यसन न करणे हे एक तत्व आहे आणि ह्या तत्त्वाचे पालन मनोदय संस्थेच्या वतीने केले जात आहे.
कार्यक्रमाला, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले, समुपदेशक अक्षय कदम, कार्यक्रमाचे समन्वयक मैत्रेयी पाध्ये आणि प्रज्ञा जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तिन्ही वस्तांमधून ५५ मुलांनी व मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड येथील २० मुलांनी इंटर्नशिप म्हणून या कार्यक्रमात सहभागी घेतला.

संस्थेचे संचालक डॉ. विष्णू श्रीमंगले यांनी प्रास्ताविक केले. बुध्द पौर्णिमा निमित्त बुद्धांनी दुःख मुक्तीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधले. त्याचप्रमाणे वस्तीमधील व्यसनाधीनतामुळे अनेक कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या दु:खातून ते मनोदय व्यसनमुक्ती संस्थेच्या मदतीने बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहेत अशी भावना विष्णू श्रीमंगले यांनी व्यक्त केली.