मानव विकास संशोधन केंद्राचा अनोखा उपक्रम

पुणे दि. 11 जून 2022

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वैदू ,जोशी,डवरी गोसावी, तिलमारी,नंदीवाले,बहुरूपी, कैकाडी, नट, मदारी,ढोलकीवाले,वडार,पारधी ह्या भटक्या विमुक्त समाजातील जवळपास ३००० ते ५००० व्यक्ती अर्थात ६०० कुटुंबे शहरात विविध भागांमध्ये पालावर वास्तव्य करून राहतात. त्यांच्या आजूबाजूला गोंड,आदिवासी तसेच वंचित घटकायील काही कुटुंबेही भाड्याने वास्तव्य करून आहेत.

भोसरी परिसरातील चक्रपाणी वसाहत व मोहन नगर येथे मानव विकास संशोधन केंद्राच्या वतीने उपरोल्लेखित घटकातील मुलांच्याकरीता पालावरची शाळा हा उपक्रम मागील ३ वर्षांपासून चालविल्या जातो आहे. शाळेत जाऊ इच्छिणाऱ्या व शाळाबाह्य अशा मुलांना ह्या उपक्रमात मूलभूत गणित,मराठी व इंग्रजी शिकविण्यात येते. शाळाबाह्य मुलांना महानगरपालिकेद्वारा संचालित शाळांत प्रवेशित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.

संस्थेच्या मार्फत संचालित पालावरची शाळा या उपक्रमात दोन्ही ठिकाणच्या केंद्रावरील मिळून १३६ मुले- मुली आहेत. त्यांच्याकरिता खालील शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण आपल्या संस्था / समाज , मित्रमंडळी यांच्या सहकार्याने संस्थेला खालील शैक्षणिक साहित्य मिळवून देण्याकामी सहकार्य करावे हि विनंती ..

१ . व्हाईटबोर्ड – २
२. अंकलिपी – १३६
३. नोटबुक्स – ६८०
४. मिनी कंपास – १३६
५. शैक्षणिक तक्ते – ६०
६. कथा – कविता, चित्रकला विषयक पुस्तके

● संस्थेचा पत्ता :-

मानव विकास संशोधन केंद्र
श्रीराम इंडस्ट्रीज, १४/१, आनंद इंडस्ट्रीयल इस्टेट, आनंद नगर,भोसरी,पुणे – ३९

● बँक खात्याचा तपशील : –

मानव विकास संशोधन केंद्र
खाते क्रमांक – 6835774674
आयएफएससी – MAHB0000386
बँक ऑफ महाराष्ट्र, भोसरी पुणे – ३९
Google Pay – 9881667453

——————-

भालचंद्र दत्तात्रय सावंत
संस्थापक अध्यक्ष
९२२६०४५६९०

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply