– राज्य काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे, दि. २३ जुलै 2022 :
गुलामीच्या पारतंत्र्यातील खितपत देशास ‘भारतीय प्रजासत्ताक’ अर्थात प्रजेची लोकशाहीरुपी-सत्ता बनवण्याचे महत् कार्य गांधींनी ‘सत्य व अहिंसेच्या’ तत्वांवर केल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचे ते जननायक झाले व महात्मा ठरले अशी भावना काँग्रेस राज्य प्रवक्ते व गांधी जाणूयात पुणे ग्रुपचे सदस्य गोपाळदादा तिवारी यांनी knowing Gandhi, Pune (गांधी जाणूयात, पुणे) ग्रुपतर्फे आयोजित स्नेह संमेलनात केले.
‘गांधी जाणूयात, पुणे’चे स्नेह संमेलन शनिवारी हॅाटेल सेंट्रल पार्क, शिवाजी नगर येथे संपन्न झाले. यावेळी प्रा. अक्षय कदम, रमाकांत पाठक, संकेत मुनोत, बी.आर. माडगूळकर, सुर्यकांत मारणे, समीर गांधी, अतुल आपटे, भोला वांजळे, ऍड. अश्विनी गवारे, सुशील जोहरापुरकर, दिग्दर्शिका स्वप्ना पाटसकर, एकनाथ पाठक, पत्रकार दीपक जाधव उपस्थित होते. यावेळी अनेक सदस्यांनी ‘गांधी विचार’ पुढे नेण्याबाबत महत्त्वपूर्ण सुचना केल्या.
यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, महात्मा गांधींचे मार्गदर्नाखाली पं नेहरू, सरदार पटेल, डॅा आंबेडकरांनी लोकशाही रूपी ‘प्रजेची-सत्ता’ स्थापित करून, प्रजेस ‘स्वतंत्र भारताचे नागरीक’ बनवून देशाचे सत्ताधारी ठरवण्याचा अधिकार संविधानद्वारे दिला व स्वातंत्र्य लढ्यात जीवांचे बलीदान देणाऱ्या शहीदांचे लोकशाहीरूपी स्वतंत्र भारताचे स्वप्न उदयास आले याचे उचित स्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात करणे व त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे भारतीयांचे कर्तव्य ठरते.
सत्य व अहिंसेच्या तत्वांमुळेच जगात ‘बापूं’ची व देशाची प्रतिष्ठा वाढली परंतु त्यांनी भारतास घालून दिलेल्या ‘सत्यमेव जयते’च्या ब्रीद वरील अशोक स्तंभ या ‘राष्ट्रीय मानचिन्हाचे’ स्वरूप बदलण्याचे निंद्य प्रयत्न मोदी सरकार करत असले मुळे ‘गांधी जाणुयात, पुणे’ तर्फे या विषयी सत्त्याग्रह आंदोलन करावे लागेल व त्या बाबत संघर्षास तयार रहावे असे आवाहन तिवारी यांनी यावेळी केले.
दिग्दर्शिका स्वप्ना पाटसकर म्हणाल्या, गांधी विचार समजून सांगणारे छोटे-छोटे व्हिडीओ आपण तयार करूयात. त्यासाठी आपल्या ग्रुपची मदत मला लागेल. येत्या 15 ऑगस्टला घर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जाणार आहे.
त्याचबरोबर आपण सर्वांनी ‘घर घर गांधी’ हा उपक्रम राबवून गांधी विचारांचा प्रसार करूयात.
समीर गांधी यांनी स्वप्ना पाटसकर यांच्या गांधी विचारांचे व्हिडीओ तयार करण्याच्या उपक्रमास 21 हजार रुपयांची देणगी देणार आल्याची घोषणा यावेळी केली.

प्रा. अक्षय कदम यांनी गांधींचे विचार अधिक आक्रमकपणे मांडण्याची गरज असल्याचे सांगितले. भोळा वांजळे यांनी सांगितले की, पुढच्या महिन्यात पुण्यात गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा होईल. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून गांधीजींचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविता येतील.
बी. आर. माडगूळकर यांनी पिंपरी-चिंचवड येथे उभे राहत असलेल्या गांधी स्मारकाबाबत यावेळी माहिती दिली. दादर मुजावर यांनी गांधी विचारांचा जागर करण्यासाठी एक दिवसांचे शिबिर घ्यावे अशी सूचना केली.
गांधी विचार शाळेतील विद्यार्थ्यांना पोहचवण्यासाठी महात्मा गांधी व राष्ट्रीय नेत्यांवर तसेच स्वातंत्र्य संग्रामावर शालेय विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा घ्याव्यात. व्याख्यानांचे आयोजन करावे आदी सूचना सुशील जोहरापुरकर यांनी केल्या.
सद्य देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता, भाजप – संघीय विचारांचे अतिक्रमण, संविधानिक मुल्यांची पायमल्ली, धार्मिक जातीय ध्रुवीकरण इ द्वारा सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम चालू आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रुपचे ॲडमिन संकेत मुनोत यांनी केले. सुभाष थोरवे यांनी आभार मानले. यावेळी रोहिणी काळे, स्वाती खिलारे, वैशाली खुणे, संजय मानकर, फैय्याज शेख, सूर्यकांत मारणे, सचिन भोसले, सुभाष थोरवे, तुळशीदास काळदाते, निवेदिता कुलकर्णी आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.