भारतीय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नांव लागते, याचे भान नाही का..?

You are currently viewing भारतीय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नांव लागते, याचे भान नाही का..?

काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा सवाल
मुंबई, दि. 9 फेब्रुवारी 2023 : इंग्रज विरोधी स्वातंत्र्य लढ्यात तब्बल ७ वेळा अटक होऊन, ११ वर्षे जेल यातना भोगलेले, थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत नेहरू यांची कन्या इंदीरा यांचे हिंदू विवाह (अग्निसाक्ष सप्तपदी) संस्कारनंतर इंदीरा फिरोज गांघी असे आडनाव लागले. तरीही त्याबाबत चुकीचे विधाने करताना पंतप्रधान यांनी भान ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

पुढे पं. नेहरू यांच्या निधनानंतर (त्यांचे पश्चात) लाल बहादूर शास्त्री नंतर इंदीरा जी गांधी काँग्रेस अध्यक्षा व पुढे पंतप्रधान झाल्या.. त्या नंतर ही त्यांचे सुपुत्र राजीव गांधी देखील देशाचे पंतप्रधान झाले व अर्थात त्यांचे सुपुत्र श्री राहूल जी गांघी हे काँग्रेस चे नेतृत्व करीत आहेत.

पंतप्रधान मोदी यांना ज्या निवडणुकीत देशातील जनतेने ३१ व ३७ टक्के मते देऊन भाजपला २०१४ व २०१९ दोन्ही वेळेस सत्तास्थानी बसवले आहे. त्याचवेळी दोन्ही निवडणुकीत व २०१४ नंतर च्या विविध राज्यातील निवडणुकीत याच देशातील जनतेने काँग्रेसला ‘दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षा कवच’ दिल्याचे सोईस्करपणे ते कसे विसरतात असा संतप्त सवाल तिवारी यांनी केला

स्वकर्माची पापे व अपयशे झाकण्यासाठी मोदी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोक भावनेची व जनतेने विरोधी पक्ष म्हणून दिलेल्या पसंतीची कुचेष्टा करीत खिल्ली उडवणे, हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करणाऱ्या जनतेचा अपमान असल्याची उपरोधिक टिका काँग्रेस तिवारी यांनी केली.


महात्मा गांधी, नेहरू, आझाद, बोस व पटेलांच्या नेतृत्वाखाली काॅग्रेस ने देशास स्वातंत्र्य मिळवून दिल्या मुळे व डॅा आंबेडकरांच्या संवैधानिक लोकशाहीच्या स्थापनेमुळे व ती (२०१४ अखेर) ६४ वर्षे जीवंत ठेवल्यामुळे भाषणजीवी ‘मोदींचा भाजप’ सत्ता स्थानी आला, किमान याचे भान व जाणीव अहंकारी मोदींना नसावी हे दुर्दैव आहे..!
“देशाच्या संसद रूपी मंदीरात, लोकशाही मार्गाने देशातील जनतेनेच् निवडून पाठवलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे न देणे, त्यांच्या आरोपांचे समाधान न करणे व आपल्या राजकीय जबादरीपासून पळ काढणे, धुळ फेक करणे हे जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply