गुजरात-आसाममध्ये मांडलाय बाजार ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा’ : काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी

You are currently viewing गुजरात-आसाममध्ये मांडलाय बाजार ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा’ : काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे, दि. 25 जून 2022
महाराष्ट्रात घटनात्मकरित्या स्थापन करण्यात आलेल्या मविआ सरकार मधील सत्ताधाऱ्यांवर ईडी, सीबीआय, एनसीए आदी यंत्रणांचा वापर करून ही सरकार पडत नाही हे पाहील्यावर, भाजप कडून आता गुजरात व आसाम या राज्यातून ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा खरेदी-विक्रीचा घाट’ घातला जात आहे असा थेट आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

आपल्या मागे राष्ट्रीय पक्षाची महाशक्ती असून, कोणत्याही बाबतीत काहीही कमी पडणार नाही” असे वक्तव्य एकनाथ शिंदे कशाच्या आधारे करत आहेत. त्यांचे हे विधानच या फोडाफोडी मागे संपूर्णतः भाजप असल्याचे सिद्ध करत आहे.

केंद्रात सत्तेत आल्यानंतर कर्नाटक, मप्र, गोवा, गुजरात आदी राज्यातील आमदारांच्या फोडाफोडीने भाजपने सत्ता हस्तगत केल्याची कामगीरी सर्वश्रुत आहेच. भाजपची ही ‘सत्ता लालसेची’ कुटील कारस्थाने निंदनीय असून, लोकशाही व नैतिक मुल्यांना तिलांजली देणारी आहेत अशी टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असून, आसाम-गुजरातमध्ये सत्तेचा बाजार मांडला गेला आहे.

स्वात्र्यंतोतर भारतात लोकशाही मुल्यांची जोपासना होण्यासाठी, भ्रष्ट नितीमुल्यांना व सत्तेच्या दलालांच्या संधीसाधू-पणास आळा घालण्यासाठीच् काँग्रेस नेते, तत्कालीन पंतप्रधान स्व राजीव जी गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला. स्वातंत्र्योत्तर भारताचे देशाचे ते पंतप्रधान कुठे आणि या लोकशाहीच्या नितीमूल्यांची पायमल्ली करणारे सद्याचे भाषणजीवी पंतप्रधान कुठे? असा प्रश्न पडतो आहे. लोकशाही मुल्ये व नैतिकतेचा दृष्टिकोनच हरवत चालल्याची खंत गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

गोपाळदादा तिवारी, राज्य प्रवक्ते, काँग्रेस

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply