नमस्कार,
खाजगी हॉस्पिटलने रुग्ण हक्कांचे उल्लंघन केल्यास तसेच दरपत्रक न लावल्यास त्याविरोधात तक्रार करण्याचा हक्क नागरिकांना कायद्याने दिला आहे. पुणे महापालिकेने यासाठी तक्रार निवारण कक्ष व त्याचा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला आहे. त्याला नुकताच एक महिना पूर्ण झाला. हा क्रमांक सर्व खाजगी हॉस्पिटलनी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
मात्र डॉक्टरांच्या एका संघटनेने त्यांच्या बैठकीत हा क्रमांक हॉस्पिटलमध्ये लावू नयेत अशा बेकायदेशीर सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबरोबर पालिका प्रशासनावर ते संघटनेचा वापर करून दबाव टाकत आहेत. त्यामुळे तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित झाली तरी पुणेकरंपर्यंत त्याची माहिती पोहचू शकलेली नाही.
यापार्श्वभूमीवर सर्व पुणेकरांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या नजीकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे. तिथे हॉस्पिटलनी तक्रार निवारण कक्षाचा क्रमांक दर्शनी भागात लावला नसेल तर त्यांची तक्रार महापालिकेच्या 18002334151 या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर फोन करून करावी. (हा क्रमांक सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत सुरू असतो.)
डॉक्टर संघटना जर कायद्याच्या अंमलबजावणीला जाहीरपणे आडकाठी आणत असतील तर त्याला आपल्याला विवेकी उत्तर द्यावेच लागेल. तरी पुणेकर नागरिकांनी टोल फ्री क्रमांकाद्वारे एक फोन करून तक्रार निवारण कक्षाचा क्रमांक प्रदर्शित व्हावा यासाठी एक छोटी कृती नक्की करावी.
सध्या खाजगी हॉस्पिटलच्या प्रचंड वाढलेल्या शोषणापासून रुग्णांची सुटका व्हायची असेल त्यांच्यावर शासनाचे नियंत्रण यायचे असेल तर हा कक्ष सक्षमपणे कार्यान्वित होणे गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचे हा 18002334151 टोल फ्री क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्यास व गरज पडल्यास नियमभंग करणाऱ्या खाजगी हॉस्पिटलविरुद्ध तक्रार करण्यास विसरू नका.
लढेंगे, जितेंगे।
- सर्व सुजाण पुणेकर