पुणे, दि. 23 मार्च 2022
विचारवेध तसेच महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर पुणे शाखा, जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय (NAPM), युवक क्रांती दल (युक्रांद) यांच्यावतीने ‘आपण आणि धर्मनिरपेक्षता’ या विषयावर शनिवार, 2 एप्रिल 2022 रोजी दु. 2 ते सायं. 6 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

संविधान अभ्यासक
सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जसे झटावे लागते, तसे वैचारिक प्रश्नावर देखील लढावे लागत आहे. धर्मनिरपेक्षता हा जितका महत्वाचा मुद्दा आहे, त्याहून तो कळीचाही मुद्दा बनलेला आहे. या मुद्द्यावर अनेकदा निरुत्तर व्हावे लागते, अनेक पेच निर्माण होतात. त्यामुळे धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण संवादी आणि सहभागी पद्धतीने कार्यशाळा घेत आहोत. तरी आपण या कार्यशाळेसाठी नावनोंदणी करून सहभागी व्हावे, ही विनंती !
१) प्रशिक्षणाचा दिनांक व वेळ व ठिकाण :
दिनांक – 2 एप्रिल 2022, शनिवार
वेळ- दु. 2 ते सायंकाळी 6
ठिकाण : विचारवेध कार्यालय ,समाजवादी महिला सभा, मॅजेस्टिक बुक स्टोलशेजारी, नारायणपेठ पोलीस चौकीमागे, शनिवार पेठ, 30
२) प्रशिक्षण फी : ₹ 50
३) नावनोंदणी मुदत 30 मार्चपर्यंत असेल.
४) नाव नोंदणीसाठी संपर्क : सुदर्शन चखाले 7887630615 या नंबरवर 50 रुपये गुगल पे करावेत. स्क्रीनशॉट व नाव याच नंबरवर पाठवावे.
५) पुस्तक, सहभागप्रमाणपत्र देण्यात येईल.
६) 50 प्रशिक्षणार्थी प्रवेश मर्यादित.
७) पूर्णवेळ उपस्थिती आवश्यक
अधिक माहितीसाठी संपर्क
7887630615 सुदर्शन चखाले
7276559318 विशाल विमल
9921945286 मनिष देशपांडे
आयोजक : विचारवेध
● सहयोगी संघटना●
- महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर पुणे शाखा
- जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय (NAPM)
- युवक क्रांतीदल (युक्रांद)