सार्वजनिक आरोग्याच्या धोरणांबाबत 26 एप्रिल रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण परिषद

You are currently viewing सार्वजनिक आरोग्याच्या धोरणांबाबत 26 एप्रिल रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण परिषद

मुंबई, दि. २४ मार्च 2022 –

यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबईच्या आरोग्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक विभागातर्फे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी २६ एप्रिल २०२२ रोजी एक दिवसीय ‘आरोग्य जागृती अभियान परिषद-२०२२’ आयोजित करण्यात आली आहे.

परिषदेच्या निमंत्रक तथा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे.

या परिषदेत राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसेच केंद्र सरकारची आयुष आरोग्य योजना अशा विविध आरोग्य योजनांबाबतची भूमिका, सल्ला, दुरुस्त्या आणि आक्षेप यांसह विविध बाजूंवर सर्वंकष चर्चा करण्यात येणार आहे. शासनाचे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिष्ठाता, धर्मादाय दवाखाने तसेच स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहेत.

आरोग्य विषयाचा अभ्यास व अनुभव असणारे जाणकार, तज्ज्ञांचे पेपर या परिषदेत सादर करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करुन या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

परिषदेत सहभागी होण्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख २४ एप्रिल २०२२ असून प्रत्यक्ष आरोग्य परिषद २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान होईल. यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे ही परिषद होईल, असे त्यांनी कळवले आहे.

पेपर १५ एप्रिलपर्यंत सादर करावेत
या परिषदेत ज्यांना पेपर सादर करायचे आहेत आणि परिषदेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. येथे सर्व माहिती उपलब्ध आहे. या वेबसाईटवर ‘गुगल फॉर्म द्वारे’ पेपर अपलोड करावेत. त्याची अंतिम मुदत १५ एप्रिल आहे. या तारखेर्यंत १२००- १५०० इतके शब्द या मर्यादेत लेखन करून मुद्देसुद मांडणी अपलोड करावी.

यानुसार आलेल्या सर्व पेपरमधून निवड तज्ज्ञांची समिती अंतिम पेपर निवड करेल. त्यानंतर संबंधित व्यक्तीला परिषदेच्या दिवशी सादरीकरण करता येईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी दिपिका शेरखाने यांच्याशी ९८६७१५५३४५ संपर्क साधावा.

जागल्या वेब पोर्टल हे लोकवर्गणीतून चालवले जाते. सार्वजनिक आरोग्य, उच्च शिक्षण-रोजगार हे विषय येथे प्राधान्याने मांडले जातात. आपण जागल्याचे ऐच्छिक वर्गणीदार (200 रु/500 रु/1000 रु) होऊन आमच्या पत्रकारितेला आपले पाठबळ द्यावे. ऐच्छिक वार्षिक वर्गणी, देणगी गुगल पे/फोन पे द्वारे 9922201192 या क्रमांकावर भरू शकता.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply