इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन

You are currently viewing इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन

जागल्या प्रतिनिधी : तळेगाव, दि. 16 ऑगस्ट 2022

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने ,संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय तसेच इंद्रायणी इन्स्टिट्यूट फार्मसी, ( डी फार्मसी )आणि इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, (बी फार्मसी )या तीन महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण समारंभ उद्योजक नितीन मित्तल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी समारंभाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे उपस्थित होते. तसेच कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, सदस्य गणेश खांडगे, संदीप काकडे, विलास काळोखे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य परेश पारेख, चंद्रभान खळदे, संजय साने, युवराज काकडे, संजय वाडेकर तसेच इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, माजी विद्यार्थी दशरथ जांभुळकर तसेच आजी-माजी विद्यार्थी पालक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण समारंभ प्रसंगी बोलताना श्री. नितीन मित्तल म्हणाले की, तरुणांनी व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी प्रथम त्या क्षेत्रातील अनुभव प्राप्त करणे फार गरजेचे आहे .आपल्या प्रत्येक कृतीतून देशप्रेम सदैव राहिले पाहिजे .याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सांगितले की ,स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या थोर व्यक्तींनी बलिदान दिले आहे त्यांचे नेहमी स्मरण करून त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. व उद्याचा भारत घडविण्यात साठी आपण योगदान दिले पाहिजे .तरुणांनी कमी वयात परिश्रम करून यशस्वी उद्योजक व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय, तसेच फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने यावेळी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या अभूतपूर्व बाईक रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग घेऊन भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला. सुमारे पंधराशे विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त आणि प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक वर्ग सहभाग घेतला.

सदर रॅलीचा प्रारंभ इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणातून इंद्रायणी कॉलनी, मार्गे रेल्वे अंडर पास, काका हलवाई ,नगरपरिषद, जिजामाता चौक, गणपती मंदिर चौक, बाजारपेठ मारुती मंदिर चौक, बापट बंगला मार्गे ,खांडगे पेट्रोल पंप, तळेगाव स्टेशन मार्गे एसटी बस स्टॅन्ड ,तसेच तळेगाव स्टेशन चौक ,यशवंत नगर ,शिवाजी चौक मराठा क्रांती चौक आणि इंद्रायणी महाविद्यालय मध्ये रॅलीचा समारोप संपन्न झाला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिक समाज सुधारक नेते विचारवंत शास्त्रज्ञ यांची वेशभूषा धारण करून भारत माता की जय ,वंदे मातरम अशा घोषणा देऊन देशप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या रॅलीचे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले . रॅलीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले .

सदर रॅली यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर सेवक वर्ग ,आजी-माजी विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply