डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर

You are currently viewing डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर

पुणे, दि. 17 ऑगस्ट 2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानदिनानिमित्त पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 62 जणांनी रक्तदान केले.

ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तसंकलन केले. एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने विशेष सहकार्य केले. या शिबिराला राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, काँग्रेसचे प्रवक्ते गोपालदादा तिवारी, शाहीर सचिन माळी, शीतल साठे, महाराष्ट्र अंनिसचे प्रधानसचिव संजय बनसोडे, विक्रीकर अधिकारी मनीषा गंपले, शिक्षणअधिकारी कमलादेवी आवटे, प्रहार संघटनेचे धमेन्द्र सातव आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी भूमिका व्यक्त केली. रविराज थोरात, वनिता फाळके, लालचंद कुंवर, विनोद खरटमोल, घनश्याम येणगे आदी यावेळी उपस्थित होते.

जाती, धर्मातील माणसांमध्ये भेदभाव मोठया प्रमाणात आजही पाळला जातो. रक्त हा सर्वांसाठी आवश्यक घटक असून त्याला कोणत्या जाती-धर्माचा रंग नाही. रक्त हा एकत्व सांगनारा घटक असून समाजात आपण सारे एक आहोत, अशी भावना निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिरे सर्व स्तरांमध्ये होण्याची याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply