जागल्या : 24 नोव्हेंबर 2022
द पुना गुजराती केळवणी मंडळाचे एच. व्ही.देसाई महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या उपक्रमात १७ विद्यार्थी तामिळनाडू येथील कोइंबतूरच्या नेहरू आर्ट्स अँड सायन्स कॉलेज द्वारा आयोजित “Students Research and Cultural Exchange Program” मध्ये दिनांक ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, व पाँडिचेरी या पाच राज्यांच्या टीम सहभागी झाल्या होत्या .
एच. व्ही. देसाई कॉलेज म्हणजेच महाराष्ट्राच्या टीमचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन इंग्रजी विभागप्रमुख डॉ. महावीर सांकला, प्रा. श्रद्धा सांकला व प्रा. प्रशांत इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर डॉ. महावीर सांकला यांचे “Developing Research Idea” या संशोधनात्मक विषयावर व्याख्यान झाले.
सर्व राज्यांच्या टीमला गट चर्चेसाठी विविध विषय देण्यात आले तसेच इतर नामांकित प्राध्यापकांचे संशोधनपर व्याख्यान सादर झाले. ९ नोव्हेंबर रोजी एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर शोध निबंध सादर केले. यामधील “Cyber Feminism, Inhouse Feminism, Soft Masculinity, Changing Marriage system, History of Cinema, Class Conflict, Fashion and Differences” आदी विषयावरील शोध निबंधांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

पुढील सत्रात जवळच्या जगविख्यात ‘ईशा फाउंडेशन’ येथे साहित्य व आध्यात्मिकता यांच्या तुलनात्मक संशोधन अभ्यासासाठी भेट दिली. १० नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे लोकधारा, पोवाडा, लावणी, भारुड असे विविध कार्यक्रम इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
समारोपाच्या कार्यक्रमात इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध संशोधन लेख पुस्तकाच्या रूपात आंतरराष्ट्रीय नोशन पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे नाव “HVD’s Research Waves” असे असून ते कै. हरिभाई शाह यांना समर्पित करण्यात आले. हे पुस्तक अमेझॉनवर विक्रीस उपलब्ध आहे. सदर उपक्रमामध्ये आदिनाथ गायकवाड, वरद निंबाळकर, पार्थ पोतदार, मर्मित पवार, गजानन कदम, प्रदीप गाडे, निशाद गाडे, प्रतिक कोठारी, भक्ती माने, आर्या निकुंभ, आदिती वखारिया, पुजा वनशेटे, गायत्री बादम, साक्षी मानकर, संजीवनी साळुंखे, मानसी मोरे, चांदणी जडीए यांचा सहभाग होता.
या उपक्रमास पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेशभाई शाह , मानद मंत्री हेमंतभाई मणियार, प्राचार्य डॉ. गणेश राऊत, उपप्राचार्य डॉ. नीता बोकील व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. महावीर सांकला यांचे सहकार्य लाभले.