तात्पुरता आक्रोश करून काहीच निष्पन्न होणार नाही…

You are currently viewing तात्पुरता आक्रोश करून काहीच निष्पन्न होणार नाही…

पुणे, दिनांक 3 एप्रिल 2015भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झाल्या. मात्र 10 लाख रुपयांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झाल्या. मात्र 10 लाख रुपयांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

काही प्रश्न
1 एका आमदाराच्या स्वीय सहायकांच्या कुटुंबांत हे घडत असेल तर सामान्य माणसाला खाजगी रुग्णालयात काय वागणूक दररोज मिळत असेल?
2 एखादी घटना घडल्यानंतर तात्पुरता आक्रोश तयार होतो, मात्र खाजगी रुग्णालयांवर कायदा करून नियंत्रण आणले पाहिजे ही मागणी घेऊन आरोग्य चळवळीतील कार्यकर्ते सातत्याने आवाज उठवत असताना त्याला समाजाकडून किती प्रतिसाद मिळतो.
3 समाज एक मोठी ताकद आहे. कुणाल कामरा प्रकरणात या ताकदीची छोटी चुणूक लोकांनी जरूर दाखवली. मात्र आरोग्य, शिक्षणाच्या प्रश्नांवर लोक असे एकत्र येऊ शकतील का.
4 चळवळीतील कार्यकर्ते आवाज उठवतात, प्रसार माध्यमे विषय लावून धरतात पण त्यापुढे कृती काय होते.
5 आपण खासदार, आमदार यांचे घर गाठून त्यांना याबाबत कधी जाब विचारतो का?
6 वरील प्रकरणात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्याने रुग्ण हक्काचे उल्लंघन झाले आहे, मग कारवाई करण्याचे अधिकार असलेले महापालिकेचे आरोग्य अधिकारी झोपले आहेत का, स्वतःहून ते कारवाई करू शकत नाही का.
7 खाजगी हॉस्पिटलची दादागिरी मोडायची असेल तर त्यावर सरकारी हॉस्पिटल सक्षम करणे हा एकच पर्याय आहे, त्याकडे समाज म्हणून खरंच गांभीर्याने पाहिले जाते का.
या विषयाचा आम्ही शक्य तितका पाठपुरावा करूच पण वरील प्रश्नांची उत्तर कधी मिळणार….

प्रश्न खूप आहेत, आम्ही आमच्या पातळीवर महापालिका प्रशासन, राज्याच्या आरोग्य विभागाकडे याचा पाठपुरावा करू पण व्यापक पाठबळ मिळाल्याशिवाय आम्ही काही करू शकणार नाही.

दीपक जाधव,
जागल्या आरोग्य हक्क समिती

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply