सुभाष मुळे
पुणे, 19 जुलै 2022
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंटक कामगार संघटनेचे वतीने बुधवार दि. १३ जुलै २०२२ रोजी इ.१० वी मध्ये ९८% गुण मिळवून शाळेत पहिली आलेली कार्तिकी मार्कंडे हीच्यासह पुजा शिंदे, आदित्य भालेराव, प्रसाद पतंगे इत्यादी १० वी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संघटनेच्या कार्यालयात करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कार्तिकी म्हणाली की, माझे वडील माझ्या लहानपणीच देवाघरी निघून गेले परंतू केवळ माझ्या आईची साथ व मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादन करू शकले. त्यामुळे हा सत्कार मी माझ्या आईला बहाल करते असे भावनिक विचार व्यक्त केले.

यावेळी सहाय्यक कक्षाधिकारी (लेखा) या पदावर नुकतीच पदोन्नती झाल्याबद्दल रघुनाथ चव्हाण सर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच इंटक कामगार संघटनेच्या संघटकपदी राजू खामकर, महिला संघटकपदी राधिका खांडेकर तर कार्यकारिणी सदस्य पदी बाळासाहेब कांबळे, अशोक साळवे, संतोष शिंदे, सुनिल कदम, मनिषा मार्कंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचवेळी राजू खामकर, जितेंद्र कोंडे यांचेसह नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे पुष्प गुच्छ देवून संघटनेचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ ,सरचिटणीस सुभाष मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चेरीयाल, कार्याध्यक्ष किशोर घडीयार, सहसचिव महेश मंडलिक यांचे हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी इंटक कामगार संघटनेचे विलास भालेराव, सहखजिनदार जयंत कुलकर्णी, सुब्रमणीयन तिरूमणी यांचेसह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कीशोर घडीयार यांनी केले तर ज्ञानेश्वर चेरीयाल, यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सुभाष मुळे
सरचिटणीस,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंटक कामगार संघटना, पुणे ७
मो.नं. ९२७२३१७०७२