भाषेच्या प्रत्येक शिक्षकाने जर हे पुस्तक वाचले तर मराठी भाषेला खूप फायदा होईल

You are currently viewing भाषेच्या प्रत्येक शिक्षकाने जर हे पुस्तक वाचले तर मराठी भाषेला खूप फायदा होईल

प्रा. गणेश देवी

डॉ. नवनाथ तुपे यांचे ‘वाचन दिशा आणि दृष्टिकोन’ यांसारखे वाचनाची कला आणि वाचनाचे शास्त्र या विषयावर मराठीत इतके सुरेख आणि प्रभावी पुस्तक मी दुसरे पाहिले नाही. वाचन हे श्वासोच्छ्‌वासाइतकेच सोपे आणि नैसर्गिक आहे, असा सर्वसाधारण समज असला तरी त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येते की, वाचन ही एक गुंतागुंतीची न्यूरोलॉजिकल, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे.

डॉ. तुपे हे वाचनाशी निगडित या सर्व पैलूंवर तर प्रकाश टाकतातच; शिवाय हे पुस्तक शाळेतील शिक्षकांच्या वापरासाठी आणि डिस्लेक्सिया असलेल्या मुलांबरोबर वाचन व्यवहार करणाऱ्यांसाठी एक वस्तुपाठ घालून देते.


खरंतर, ज्या काळात भाषा तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मशिन्सच्या आक्रमणामुळे वाचनाची सवय कमी होत चालली आहे, अशा काळात हे पुस्तक सामाजिक माध्यमांच्या वादळात हरवलेल्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेबाबत आणि जटील अर्थग्रहणाबाबत उदासीन असलेल्या या नव्या पिढीसाठी दीपस्तंभ म्हणून काम करत आहे.

हे पुस्तक दीर्घ विमर्शी चिंतन आणि या क्षेत्रातील सखोल संशोधनावर आधारित आहे; आणि ते अशा शैलीत लिहिलेले आहे की, जे शिक्षणशास्त्राच्या कोणत्याही प्रगत विद्यार्थ्याला शैक्षणिक क्षेत्रात प्रवेशयोग्य बनवते. भाषेच्या प्रत्येक शिक्षकाने जर हे पुस्तक वाचले तर मराठी भाषेला खूप फायदा होईल.

प्रा. गणेश देवी
भारतीय भाषा तज्ज्ञ

जागल्याच्या बातम्या व लेखांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील बटण क्लिक करून आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Reply