मा. प्रकाश आबिटकर,
आरोग्यमंत्री, महाराष्ट्र
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल पासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याशिवाय वेतन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून हे हाणून पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे.
मागील वेळेस आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी याबाबतचे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच या संघटनांनी मुंडे यांची बदली घडवून आणली.
हिंगोली येथील बायोमेट्रिक हजेरीचे एप्रिल महिन्यातील रजिस्टर उजेडात आले आहे. त्यामध्ये डॉक्टर, कर्मचारी महिन्यातून पंधरा दिवसांपेक्षा जास्त दांड्या मारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यभर हीच परिस्थिती असून एकूणच हे अत्यंत गंभीर आहे.
डॉक्टर दांड्या मारतात हे नवीन नाही, मात्र त्याचे प्रमाण महिन्यातून पंधरा दिवसांपेक्षा जास्त असणे हे धक्कादायक आहे. याचे खूप गंभीर परिणाम सरकारी आरोग्यवस्थेवर होत आहेत.
पुढील महिनाभरात हे सुरळीत न झाल्यास मुंबईतील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर जागल्या कडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
– दीपक जाधव
जागल्या आरोग्य हक्क समिती
महिनाभरात बायोमेट्रिक हजेरी सुरळीत न झाल्यास जागल्याकडून आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयापुढे बेमुदत धरणे आंदोलन
